लोकप्रिय हिंदी टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. सध्या या शोची बरीच चर्चा होताना दिसते. शोच्या पहिल्याच दिवसांपासून स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते असून स्पर्धकांचे खरे चेहरे आता प्रेक्षकांसमोर येताना दिसत आहे. या शोमध्ये टीव्ही व सोशल मीडियावरील अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहे. ज्यामध्ये एका नावाची सध्या जास्त चर्चा होताना दिसते, ती म्हणजे अभिनेत्री रिंकू धवन. नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली रिंकू सध्या बिग बॉसच्या घरात बंद आहे. (Bigg Boss 17 fame Rinku Dhawan and Kiran Karmarkar Son)
रिंकूने तिच्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. आपल्या खलनायिका पात्रांमुळे ती जितकी चर्चेत आली होती, तितकीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेली आहे. अभिनेत्रीने ‘कहानी घर घर की’ मालिकेत काम केलं असून याच मालिकेदरम्यान ती सुप्रसिद्ध मराठी अभिनेते किरण करमरकर यांच्या प्रेमात पडली. २००२ मध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकले. मात्र, १५ वर्षांच्या या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. या जोडीला एक मुलगा असून घटस्फोटानंतरही त्यांनी या नात्यावरील परिणाम त्यांच्या मुलावर होऊ दिला नाही.
हे देखील वाचा – सायली विरोधात कुटुंबातील व्यक्तींनीच रचलं कटकारस्थान, गरोदरपणावरही प्रश्नचिन्ह, प्रोमो पाहून प्रेक्षकही गडबडले
किरण आणि रिंकू यांचं २०१९ मध्ये घटस्फोट झाला. तसेच ते घटस्फोट होण्याआधी एक वर्ष वेगळे राहत होते. पण त्यावेळेस त्यांना हे प्रकरण खासगी ठेवायचं होतं. किरण यांनी रिंकूबरोबरच्या नात्याबद्दल ‘बॉम्बे टाईम्स’शी संवाद साधताना म्हणाले होते की, २००२ मध्ये आम्ही लग्न केलं असून आमच्या लग्नाला १५ वर्ष पूर्ण झाली. सर्वात आनंदाची बाब म्हणजे आम्हाला एक मुलगा आहे. तसेच व्यावसायिक कारणांमुळे आमचं लग्न मोडल्याचं वाटत नसल्याचं सांगताना ते म्हणाले, “एक वेळ अशी आली होती की, आमच्या जीवनातील काही गोष्टींमुळे आमचं दोघांचं पटत नव्हतं. त्यामुळे आम्ही वेगळे झालो.”
हे देखील वाचा – लग्न होऊनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे व विकी जैन, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “हनिमूननंतर…”
पुढे दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णयावर मुलाची काय प्रतिक्रिया होती. यावर बोलताना ते म्हणाले, “एक वेळ अशी आली होती की, आम्ही आमच्या मुलाला यासाठी तयार करू आणि त्याला हे सगळं समजावून सांगू की, आम्ही वेगळे होत आहोत. मात्र, आज तो आमच्या दोघांबरोबर राहू शकतो. त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं होतं की, आम्ही तुला चांगल्या-वाईट काळात मदत करू आणि जिथे तो चुकला तिथे त्याच्यात सुधारणा करू.” तसेच त्यांनी हेदेखील सांगितलं की, सणासुदीच्या दिवसात किंवा मुलाच्या विविध कार्यक्रमावेळी आम्ही त्याच्याबरोबर असतो. काही दिवसांपूर्वी रिंकूने तिच्या मुलाचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये किरण सुद्धा दिसले होते.