शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन लेकींनंतर पुन्हा मुलीलाच दिला जन्म, आई-वडील रुग्णालयातच सोडून गेले अन्…; डॉक्टरांनी असं काही केलं की…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 4, 2025 | 2:00 pm
in Social
Reading Time: 3 mins read
google-news
Newborn Baby  Emotional Story

दोन लेकींनंतर पुन्हा मुलीलाच दिला जन्म, आई-वडील रुग्णालयातच सोडून गेले अन्…; डॉक्टरांनी असं काही केलं की…

Newborn Baby  Emotional Story : सुरुवातीच्या काळात वंशाचा दिवा असावा म्हणून एखाद्या महिलेला कुटुंबाकडून खूप त्रास सहन करावा लागायचा. इतकचं नाही तर असे अनेक पालक आहेत जे मुलगी झाल्यावर नाक मुरडायचे. परंतु आता काहीस हे चित्र बदललेलं दिसत आहे. आजकाल पालक मुलगी आणि मुलांमध्ये कोणताही फरक करत नाही. तर सध्या आई-वडिलांना सांभाळण्यासाठी मुलगा नाहीतर मुलगी पुढाकार घेते अशी काही उदाहरणे पाहता आता एक मुलगीच व्हावी असे अनेकांना वाटते. एकीकडे, लोकांमध्ये मुलींची ओढ वाढत आहे, त्यादरम्यान एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की आजही काही लोक मुलींना ओझे मानतात आणि जन्मता त्यांना सोडून निघून जातात.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा मोगरी यांनी तिच्या इन्स्टाग्रामवर एक धक्कादायक कथा पोस्ट केली आहे. व्हिडीओमध्ये, तिच्या हातात गोंडस बाळ दिसत आहे, ज्याचा नुकताच जन्म झाला आहे. हे मूल तिच्या आईवडिलांची तिसरी मुलगी आहे, म्हणून कुटुंबातील सदस्य तिचा तिरस्कार करताना दिसत आहेत. ज्या देशात अध्यक्ष एक स्त्री आहे, इतकंच नाहीतर अंतराळात जाणारीही महिलाच आहे, त्या देशात मुलींबरोबर अशी वृत्ती लज्जास्पद आहे.

आणखी वाचा – शिस्त की शिक्षा; IIT विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी लेकीच्या बेडरुममध्ये लावले कॅमेरे, मुलीला सहन होईना, घरातून पळून…

यापूर्वी महिलेला आणखी दोन मुली आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत, ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी मुलगी आहे. या मुलीचा जन्म झाला तेव्हा मुलीचे वडील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत वा घरात आनंदही साजरा केला गेला नाही. कुटुंबातील सदस्यही हे निर्दोष बाळ रुग्णालयात सोडून गेले. डॉक्टरांनी येथे हार मानली नाही आणि त्यावर व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ३५ दशलक्ष लोकांनी पाहिला होता. आणि हजारो लोकांना त्या डॉक्टरांचे म्हणणे आवडले.

View this post on Instagram

A post shared by Dr Sushma (@drsushmamogri)

सोशल मिडियावर डॉक्टरांकडून ही कथा ऐकल्यानंतर त्यांना सतत फोन कॉल येत होते. लोक केवळ डॉक्टरांचेच कौतुक करत नव्हते तर कुटुंबातील सदस्यांच्या या कृत्यावरून त्यांना खडेबोल सुनावतानाही दिसले. ही पोस्ट पाहिल्यानंतर, तब्बल सात हजाराहून अधिक लोकांनी मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बाळ दत्तक घेण्याकरिता काय करावे याचा विचार करण्याऐवजी डॉक्टरांनी मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले. त्याने त्यांना सांगितले की लोकांना या मुलाला दत्तक घ्यायचे आहे. हे ऐकून त्या लोकांना यावर विश्वास नव्हता.

आणखी वाचा – “९९% काश्मिरी हे भारताशी निष्ठावान”, जावेद अख्तर यांचं मोठं विधान, म्हणाले, “पहलगाम हल्ला…”

डॉक्टर पुढे म्हणाले की, ‘हे सर्व जाणून घेतल्याने कुटुंबाला त्यांच्या निर्णयाबद्दल काज वाटली. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि त्यांनी मुलीला पूर्ण प्रेम आणि सन्मानाने आपल्याबरोबर घरी नेण्याचे मान्य केले. या पोस्टवर, नेटकऱ्यांनी कमेंट करुन डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी, काही लोक असे म्हणत आहेत की, “अशा मुलास त्यांच्याकडे सोपवायला नको होते. कारण त्यात त्या बाळाची काहीच चूक नव्हती”. त्याच वेळी, काहीजण म्हणाले की, “या मुलीला चांगल्या पालकांची आवश्यकता आहे”.

Tags: emotional viral videonewborn babyNewborn Baby  Emotional Story
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Hindavi patil lavani show

“नऊवारी साडीवर केस मोकळे सोडून नाचणं ही कुठली लावणी?”, हिंदवी पाटीलचा इशारा नक्की कोणाकडे?, थेट म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.