‘बिग बॉस १७’ मुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चर्चेत आली. अंकिता व विकी यांच्या येण्यामुळे यंदाचं ‘बिग बॉस’चं पर्व विशेष गाजलं. सततची भांडणं, वाद, यांमुळे ही जोडी चर्चेत राहिली. या भांडणांमुळेचं अंकिता व विकी यांच्यावरील चाहत्यांचं प्रेम काहीस कमी झालेलं पाहायला मिळालं. मात्र याउलट ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही एकमेकांसह वेळ घालवताना दिसत आहेत. एकत्र फिरतानाही दोघे दिसले. तसेच ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एकत्र पार्टीही एन्जॉय केली. (Ankita Lokhande And Vicky Jain)
‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे पतीसह फिरायला गेली आहे. नुकतीच ती विमानतळावर स्पॉट झाली होती. ती पती विकी जैनसह सुट्टीसाठी जोधपूरला गेली आहे. आता अभिनेत्री तिच्या व्हॅकेशनचे व्हिडीओ व फोटो शेअर करताना दिसत आहे. अंकिता व विकीच्या सुट्टीचे व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये मुक्काम केला आहे.

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचा पती विकी जैन झोपलेला दिसत आहे. अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती रिलॅक्स व मज्जा-मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता व विकी ड्रेसिंग गाऊन घालून सेल्फी घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ विकीने बाथरूममधून बनवला आहे, यांत अंकिताही पोज देत आहे. यावेळी विकीने आलिशान बाथरूमची झलकही दाखवली आहे.

अंकिता व विकी ‘बिग बॉस १७’ या शोमधून बाहेर पडल्यानंतर पहिलाच एकत्र प्रवास करत आहेत. शोमधून बाहेर आल्यानंतर दोघेही सतत पार्टी करताना दिसले. आता दोघांनी स्वतःसाठी वेळ काढला आहे आणि क्वालिटी टाइम घालवण्यासाठी सुट्टीवर गेले आहेत. अंकिता आणि विकीची जोडी चाहत्यांना खूप आवडते.
‘बिग बॉस’मध्ये अंकिता व विकी खूप चर्चेत होते. विकी टॉप सहामध्ये तर अंकिता लोखंडे टॉप चारमध्ये होती. या दोघांनीही या शोमध्ये चांगली कामगिरी केली.