शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुशांत सिंह राजपूतबद्दल सतत बोलते म्हणून लोकांनी सुनावलं, आता अंकिता लोखंडेने भडकून दिलं उत्तर, म्हणाली, “त्याच्याविषयी बोलणार कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankita Lokhande On Trollers

सुशांत सिंह राजपूतबद्दल सतत बोलते म्हणून लोकांनी सुनावलं, आता अंकिता लोखंडेने भडकून दिलं उत्तर, म्हणाली, "त्याच्याविषयी बोलणार कारण..."

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’मुळे विशेष चर्चेत आली. याशिवाय अभिनेत्री तिच्या ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेमुळे प्रसिद्धीस आली. ‘बिग बॉस’ याशोमध्ये अंकिता अनेकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली. पण सुशांतचा उल्लेख केल्याने अंकिताला बरेचदा ट्रोल करण्यात आले. अभिनेत्रीच्या सासूबाई रंजना जैन म्हणाल्या होत्या की, अंकिता वारंवार सुशांतचे नाव घेऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या वक्तव्यावर आता अंकिताने मौन सोडलं असून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. (Ankita Lokhande On Trollers)

अंकिता लोखंडेने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या संभाषणात अभिनेत्रीने सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केले आहे की, तिला सुशांतबद्दल बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अंकिता म्हणाली, “मला वाटते की हे माझं आयुष्य आहे. जर मी एखाद्याला ओळखते आणि मला त्या व्यक्तीबद्दल काहीतरी चांगले माहित असेल तर मी त्याचा उल्लेख करेन. सुशांतचे नाव घेण्यापासून किंवा त्याचा उल्लेख करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही”. अभिनेत्री पुढे म्हणाली की, “हा तिचा स्वतःचा निर्णय आहे आणि भविष्यातही ती सुशांतबद्दल बोलत राहील. यापलीकडे लोकांनी तिला ट्रोल केलं तर ती त्यांची मर्जी आहे”.

आणखी वाचा – ऑस्कर नामांकन मिळालेल्या व्यक्तीच्या ‘गुडी बॅग’मध्ये नक्की असतं तरी काय?, कोटी रुपयांच्या भेटवस्तू अन्…

सुशांत सिंह राजपूत व अंकिता लोखंडे यांनी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केले होते. दोघेही त्यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमध्ये भेटले होते. या शोमधूनच त्यांच प्रेम फुललं. त्यांनतर सुशांत व अंकिताने लग्नाचा निर्णय घेतला होता. पण अचानक त्यांचे नाते लग्नाआधीच तुटले. आजही अंकिताला सुशांतची आठवण येते.

आणखी वाचा – अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने अंबानींच्या पार्टीतील नवऱ्याचा डान्स पाहून उडविली खिल्ली, म्हणाली, “जामनगरमध्ये तेलाची…”

सुशांत सिंग राजपूतचे २०२०मध्ये निधन झाले. अभिनेत्याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आलं, पण सुशांतची हत्या झाल्याचं त्याच्या कुटुंबीयांना व त्याच्या चाहत्यांना वाटतंय. या अभिनेत्याचे निधन होऊन ४वर्षांहून अधिक काळ लोटला असून त्याचे कुटुंब न्यायासाठी अजूनही लढत आहे.

Tags: ankita lokhandeAnkita Lokhande On Trollersankita lokhande on trollingsushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Purshottam Berde Talked About Laxmikant Death

"लक्ष्मीकांतने हळूहळू स्वतःला संपवलं, कोणाचंही न ऐकता…", लक्ष्मीकांत बेर्डेंच्या भावाचं मोठं विधान, म्हणाले, "बायकोचं ऐकलं असतं तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.