बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकिता लोखंडेपूर्वी ‘या’ अभिनेत्रीला डेट करत होता विकी जैन, मालिकेमधील आहे सुप्रसिद्ध चेहरा, दोघांचं नातं चर्चेत होतं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 18, 2024 | 2:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg boss 17 before ankita lokhande Vicky jain had date actress tia bajpai see the details

अंकिता लोखंडेपूर्वी 'या' अभिनेत्रीला डेट करत होता विकी जैन, मालिकेमधील आहे सुप्रसिद्ध चेहरा, दोघांचं नातं चर्चेत होतं अन्...

‘बिग बॉस १७’च्या घरातील कायमच चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे शोमध्ये आल्यापासून त्यांच्यातील भांडणं, वाद यांमुळे चर्चेत राहीले आहेत. या जोडीमध्ये घरात आल्यापासून प्रेमापेक्षा अधिक संघर्षचं पाहायला मिळाला आहे. अंकिता व विकी यांच्या नात्यात अनेकदा दुरावाही आल्याचे पहीला मिळाले आहे. अभिनेत्रीने अनेकदा विकीपासून विभक्त होण्याचे भाष्य केले असल्याचे पाहायला मिळाले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अंकिताने अनेकदा तिच्या एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपुतची आठवण काढली असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्याच्या आठवणीत ती अनेकदा रडली असून त्याच्या बद्दलचे अनेक धक्कादायक खुलासेही तिने या शोमध्ये केले आहेत. यावरुनही अंकिता व विकी यांच्याट् अनेकदा मतभेद व खटके उडाले आहेत. विकीने अनेकदा अंकिताच्या या वागणुकीमुळे तिला ओरडले असल्याचे दिसून आले आहे. अशातच आता विकीच्या आयुष्यातही अंकिता आधी कुणीतरी एक अभिनेत्री होती अशा चर्चा रंगत आहेत.

आणखी वाचा – “तुझं खरं रुप…”, अंकिता लोखंडे व मुन्नवर फारुकीच्या नात्यात फुट, अभिनेत्री नको नको ते बोलली अन्…; म्हणाली, “तू वाईट…”

विकीने अंकिता लोखंडेच्या आधीसुद्धा एका अभिनेत्रीला डेट केल्या असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. ‘फिल्मीबीट’च्या एका वृत्तानुसार, विकीच्या आधीच्या गर्लफ्रेंडचे नाव ट्विंकल बाजपेयी असं आहे आणि तिला टिया बाजपेयी म्हणूनही ओळखले जाते. ही दोघे २०१२मध्ये रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. विकी बॉक्स किकेट लीगच्या टीमचा मालक होता आणि यानिमित्ताने त्यांची भेट झाली होती.

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तो आधीपासूनच भित्रा अन्…”, देवोलिना भट्टाचार्जीचे अंकिता लोखंडे व विकी जैनवर आरोप, म्हणाली “ती पूर्णपणे चुकीची…”

अर्थात विकी किंवा ट्विंकल यांच्यापैकी दोघांनीही याआधी त्यांच्या नात्याबद्दल कधीही अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. दरम्यान, ट्विंकल बाजपेयी म्हणजेच टियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘क्युकी सास भी कभी बहु थी’, ‘घर की लक्ष्मी बेटिया’, ‘अनहोनो का अंधेरा’ सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे व ‘हंटेड’, ‘१९२० एविल रीटर्न’ सारख्या चित्रपटांतही काम केले आहे.     

Tags: ankita lokhandebigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsTia bajpaivicky jainअंकिता लोखंडेटिया बाजपेयीबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Koffee With Karan Season 8

"एकदाच तारुण्य मिळत अन्…", एकाचवेळी पाचजणींना डेट करतो ओरी, अजब खुलासा, म्हणाला, "इतकी गंमत येते की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.