शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 :विकी जैन शोमधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा, नवऱ्याला खोटं ठरवलं अन्…, म्हणाली, “तो नसता तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2024 | 4:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : विकी जैन शोमधून बाहेर पडताच अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा, नवऱ्याला खोटं ठरवलं अन्…, म्हणाली, "तो नसता तर…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ ची लवकरच सांगता होणार आहे. एका दिवसावर या शोचा फिनाले आला आहे. ‘बिग बॉस’ १७चा विजेता नेमकं कोण ठरणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अलीकडेच रोहित शेट्टीने सलमान खानच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने घरातील सदस्यांना कठीण प्रश्न विचारत भंडावून सोडलं आहे. यावेळी रोहित शेट्टीनेही अंकिता लोखंडेला तिच्या गेम प्लॅनबद्दल प्रश्न केला. दरम्यान अंकितानेही अगदी धीटपणे त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.

रोहित शेट्टीने ‘बिग बॉस १७’ च्या घरात प्रवेश करताच, त्याने अंकिता लोखंडेला तिच्या खेळाबद्दल प्रश्न केला. रोहित शेट्टी म्हणाला, “संपूर्ण सीझनमधील स्पर्धकांनी म्हणजेच इथे बसलेल्या सर्व स्पर्धकांनी व घराबाहेर पडलेल्या सर्व स्पर्धकांनी विकीबद्दल काय सांगितले, तर विकी त्याच्या बायकोमुळे आला होता”. यानंतर रोहित अंकिताला प्रश्न विचारतो की, “विकी नसता तर तुझा खेळ नेमका काय असता?”

आणखी वाचा – Bigg Boss 17 : “तिच्या आयुष्याचा प्रवास…”, अंकिता लोखंडेला पाठिंबा देत ‘या’ मराठी अभिनेत्रीची भावनिक साद, म्हणाली, “खरेपणामुळे…”

यावर उत्तर देत अंकिता म्हणाली, “विकी नसता तर कदाचित मी आणखी काही करु शकले असते. कदाचित मी माझे निर्णय अधिक ठामपणे घेतले असते, असं मला वाटते. पुढे, रोहित शेट्टी अंकिताला म्हणतो, “विकीने बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळेच सांगितले आहे. अंकिता नसती तर कदाचित माझा खेळ वेगळा असता” असं विकीने म्हटलं आहे. यावर अंकिता लोखंडेने भाष्य करत म्हटलं की, “त्याला ही असं वाटू शकत”.

आणखी वाचा – प्रथमेशने मुग्धाच्या बहिणीला दिलं खास सरप्राइज, मेहुणीबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

रोहित शेट्टीने यावेळी अंकिता त्याला खेळताना कशी अडवायची हे देखील विकी जैनने सांगितले. हे ऐकून अंकिता आश्चर्यचकित होते आणि म्हणते, “सर, तो इतका खोटारडा आहे, मी त्याला कधीच अडवले नाही”. दरम्यान, अभिषेक कुमार सांगताना दिसतो की, “विकी जैनने त्याच्या शेवटच्या संभाषणातही याच गोष्टीचा उल्लेख केला होता. विकीने अंकिताला न आवडणाऱ्या लोकांशी मैत्री कशी तोडायची हे शिकवलं”. शेवटी अभिनेत्री म्हणाली, “मी त्याला खेळाबाबत काहीही बोलले नाही”.

Tags: ankita lokhandeankita lokhande and vicky jainbigg bossbigg boss 17entertainmentvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

राहुल वैद्य व दिशा परमार यांचा 'या' स्पर्धकाला पाठिंबा, फिनालेआधीच सांगितलं विजेत्याचं नाव, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.