सध्या अवघ्या देशभर सर्वत्र ख्रिसमसचा माहोल पाहायला मिळत आहे. अशातच छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ या लोकप्रिय कार्यक्रमातदेखील ख्रिसमस साजरी कारण्यात येणार आहे आणि ही ख्रिसमस साजरी करायला खास पाहुण्याला बोलावण्यात आले आहे. बिग बॉस हा शो दिवसेंदिवस अधिकच मनोरंजक होत चालला आहे. या शोमध्ये दररोज काही ना काही ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अशातच आजचा वीकेंडचा वार हा खूपच मनोरंजक असणार आहे. कारण ‘बिग बॉस १६’ चा स्पर्धक अब्दू रोजिक व अभिनेत्री रवीना टंडन यांनी शोमध्ये हजेरी लावली आहे. (Bigg Boss 17 New Promo)
नुकताच कलर्स वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे या शोचा एक नवीन प्रोमो शार करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रवीना टंडन सलमान खानला सांगते की, घरातील सदस्यांसाठी एक खास सरप्राईज आहे. यानंतर अब्दू संताच्या वेशभूषेत बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो. तसेच प्रोमोमध्ये पुढे सलमान खान व अब्दू रोजिक एकमेकांबरोबर मस्ती करतानादेखील दिसतात. अब्दूने घरातल्या सदस्यांसाठी खास भेटवस्तू आणल्या असल्याचेही तो सांगतो.
आणखी वाचा – म्हावऱ्याचा बेत अन् शाकाहारी मेजवानी; मुक्ता-सागरच्या केळवणाची अलिबागमध्ये जय्यत तयारी
यापुढे अब्दू अंकिताला बोलावतो व तिला भेटवस्तू असे म्हणतो की, तिच्याशी नेहमी भांडण करणाऱ्याला हे गिफ्ट द्यायचे आहे. यावर अभिनेत्री ते गिफ्ट अभिषेक कुमारला देते आणि त्याला तिचा ‘शत्रू’ म्हणते. यानंतर अब्दू विक्की जैनला काळ्या चेहऱ्याचा मास्क देतो आणि त्याला तो ज्याचा चेहरा पाहू इच्छित नाही त्याला तो द्यायला सांगतो. यावर विकी हे गिफ्ट अनुरागला देतो.
दरम्यान, या शोला आतापर्यंत अनेक दिवस झाले असून हा शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे घरातल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अशातच या ‘वीकेंड का वार’मध्ये अब्दुच्या येण्याने घरात धम्माल मज्जा आणि मस्ती पाहायला मिळणार आहे.