‘बिग बॉस सीझन १४’ मधील लोकप्रिय जोडी पवित्रा पुनिया व एजाज खान अखेर वेगळे झाले आहेत. या शोमध्ये दोघांमध्ये जोरदार मारामारीही झालेली पाहायला मिळाली. पण शो संपेपर्यंत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलं होतं. सोशल मीडियावर या जोडीचे त्यानंतर अनेक फोटो व व्हिडीओही पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर हे जोडपं एकत्र राहू लागलं. दोन वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता पवित्रा व एजाज वेगळे झाले आहेत. दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे. (Pavitra Punia And Ejaj Khan Sepretion)
गेल्या काही दिवसांपासून पवित्रा पुनिया व एजाज खान यांच्यातील नात्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. बरेच दिवस दोघे एकत्र दिसले नाहीत तसेच त्यांनी एकत्र काहीही पोस्ट केले नाही, यामुळे या चर्चा आणखी तीव्र झालेल्या पाहायला मिळाल्या. यानंतर आता वेगळे होण्यासंदर्भात अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘इटाइम्स’ला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली की, “गेल्या पाच महिन्यांपासून ते वेगळे आहेत. पण ते एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते”. मात्र, गेल्या महिन्यात एजाजने मालाडमधील हे अपार्टमेंट सोडले असून अभिनेत्री अजूनही तिथेच राहत आहे.
ब्रेकअपला दुजोरा देत पवित्रा पुनिया म्हणाली, “प्रत्येक गोष्टीची एक लाइफ असते. काहीही शाश्वत नसते. नात्यातही असे बरेचदा घडते. एजाज व मी काही महिन्यांपूर्वी वेगळे झालो आहोत. मला असं नेहमी वाटत की, त्यांच्यबरोबर सर्वकाही सुरळीत घडावं. मी त्याचा खूप आदर करते, पण आमचे नाते टिकू शकले नाही” असं ती म्हणाली.
‘इटाइम्स’ने एजाज खान यांच्याशीही संवाद साधला. यादरम्यान तो म्हणाला, “मला आशा आहे की पवित्राला खूप प्रेम व यश मिळेल, ज्याची ती पात्र आहे. ती नेहमी माझ्यासाठी प्रार्थना करत असते” असंही तो म्हणाला. अभिनेत्री शेवटची टीव्ही शो ‘नागमणी’मध्ये दिसली होती. त्याचवेळी एजाज शाहरुख खान व विजय सेतुपतीयांच्यासह ‘जवान’ चित्रपटात दिसला होता.