टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री व ‘बिग बॉस १३’ मधून लोकप्रिय झालेली आरती सिंह २५ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. दीपक चौहानबरोबर ती लग्न करणार असून लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. नुकताच आरतीने भारती सिंह व तिच्या संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केले होते. भारती ही नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशातच आता भारतीने आरतीच्या घरी जाऊन तेथील सर्व लगबग चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. याबरोबरच भारतीने आता आरतीच्या लग्नाची पत्रिकादेखील दाखवली आहे. चाहत्यांना आरतीच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. तसेच स्वतः आरती देखील लग्नाची पत्रिका घेऊन काशीविश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली तेव्हाचे तीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. (arti singh wedding card)
आरतीच्या लग्नाची तारीख आता दिवसेंदिवस जवळ येत चालली आहे. आशातच टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्व मंडळी तिच्या लग्नसमारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. कॉमेडी क्वीन भारतीदेखील आता आरतीच्या घरी गेली होती. यावेळी तिने आरतीच्या लग्नाच्या पत्रिकेची एक झालक शेअर केली आहे. यामध्ये पांढऱ्या व सोनेरी रंगाची थीम दिसून येते. भारती व तिचा मुलगा गोला यांनी तिच्या लग्नाची पत्रिका दाखवली आहे. ही पत्रिका एका पांढऱ्या रंगाच्या बॉक्समध्ये आहे. हा सोनेरी रंगाचा आहे. त्यावर आरती व दीपकच्या नावाचे पहिले अक्षर लिहिले होते. त्यानंतर ती आपल्या मुलाला लग्नाची पत्रिका खोलण्यास सांगते. या बॉक्समध्ये पत्रिकेबरोबरच चॉकलेट्सदेखील होते.
भारतीने या व्हिडीओमध्ये सांगितले की, “मी आरतीच्या होणाऱ्या नवऱ्याला अजून भेटले नाही. मेहंदी व लग्नाच्या दिवशीच त्याची भेट होईल. त्याला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे”. आरतीच्या लग्नसोहळ्याचे समारंभ माता की चौकी पासून सुरु झाले. आरतीने लाल रंगाचा ड्रेस घातला असून ती खूप सुंदर दिसत होती. आरतीचे लग्न अरेंज मॅरेज आहे. तीचे सर्व कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. आरतीची वहिनी व कृष्णाची पत्नी अभिनेत्री कश्मिरा शहा व मुलं यांच्याची आरतीचे खूप चांगले संबंध आहेत.
आरती सिंहदेखील लग्नाच्या आधी काशी येथे दर्शनासाठी गेली होती तेव्हा तिने आपल्या लग्नाची पत्रिकादेखील दाखवली असून ती मसुद्याच्या स्वरूपात आहे. पत्रिकेचा रंग लाल असून त्यावर सोनेरी रंगाने मजकूर लिहिण्यात आला आहे. आरतीने यावेळी लाल रंगाची साडी नेसली असून ती खूप सुंदर दिसत आहे. दरम्यान तिच्या लग्नाला आता एका आठवड्याचा कालावधी बाकी असून लग्नघरात जोरदार तयारी सुरु आहे.