लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हे पर्व प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडले नाही. ओटीटीच्या या नवीन पर्वाची जास्त जादू चालू शकली नाही. या पर्वाचे सूत्रसंचालन अभिनेते अनिल कपूर यांनी केले होते. मात्र हे प्रेक्षकांच्या पचनी पडले नाही. त्याचप्रमाणे यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांनाही हवा तितका प्रतिसाद मिळू शकला नाही. मात्र आता हे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरीप घेणार आहे. लवकरच ‘बिग बॉस…’चा अंतिम सोहळा पार पडणार आहे. (big boss ott grand final)
‘बिग बॉस…’ सुरु झाल्यापासून यामध्ये सहभागी सदस्य अधिक चर्चेत राहिले. तसेच यामध्ये अनेक ट्विस्टदेखील पाहायला मिळाले. २१ जून रोजी सुरु झालेल्या या पर्वाला आता पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. आता एक आठवडाच बाकी आहे. आता या घरात अरमान मलिक, कृतिका मलिक, रणवीर शोरी, सना मकबुल, लवकेश कटरिया व साई केतन राव हे सहभागी आहेत म्हणजेच आता सहाजण अजूनही यामध्ये सहभागी आहेत. यातून पुन्हा एकदा एक सदस्य बाहेर जाऊ शकतो.
याआधी ‘बिग बॉस…’चा अंतिम सोहळा ४ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडणार असे सांगितले जात होते. मात्र आता हा सोहळा जिओ सिनेमा शुक्रवार २ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे समोर आले आहे. जिओ सिनेमावर आता ‘खतरो के खिलाडी’चे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस…’साठी कोणताही स्लॉट रिकामा नाही.
जेव्हा हा शो सुरु झाला तेव्हा विशाल पांडे हा शेवटपर्यंत राहील अशी प्रेक्षकांची आशा होती. तसेच या दरम्यान अरमानने विशालच्या कानशिलात लागावली त्यावेळीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्याला सगळ्यांची अधिक सहानुभूति मिळाली होती. मात्र आता या पर्वाचा विजेता लवकेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या पर्वाचा विजेता नक्की कोण होणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.