बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाने कमालीची लोकप्रियता मिळवली. या सिझनमधील सगळ्याच कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या पर्वात रेडीओ जॉकी यशश्री मसुरकरही सहभागी झाली होती. ‘बिग बॉस’च्या घरातील चर्चेत असलेल्या सदस्यांपैकी यशश्री एक आहे. यशश्रीला बिग बॉस मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. बिग बॉसनंतर मात्र यशश्रीचा सिनेसृष्टीतला वावर पाहायला मिळालाच नाही. (marathi actress new movie)
आता मात्र यशश्रीच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलंय. इंस्टाग्रामवर यशश्रीने एक स्टोरी पोस्ट केली आहे आणि त्यात लिहिलंय चला मुहूर्त झाला. या माझ्या नव्या पर्वात सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे. असे कॅप्शन देत यशश्रीने तिच्या नव्या इंनिंगला सुरुवात झाल्याचं सांगितलंय. यशश्री सोबत या फोटोमध्ये तेजश्री प्रधान, अजिंक्य देव दिसतायत.
पहा तेजश्री सोबत कोणती अभिनेत्री झळकणार (marathi actress new movie)
तेजश्रीने काही दिवसांपूर्वीच लंडनला शूटिंगला जात असल्याची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. तेजश्रीच्या या नव्या चित्रपटात यशश्रीही असणार आहे, आणि चित्रपटाच्या शुटिंगनिमित्त सगळेच लंडनला रवाना झाले आहेत. यशश्री आणि तेजश्रीच्या नवीन प्रोजेक्ट विषयी जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दोघांच्या पोस्टने तर आता चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
यशश्रीने नाटकं, एकांकिका करत तिच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्द सुरु केली. छोट्या पडद्यावरील मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. ‘रंग बदलती ओढणी’ मालिकेतील तिने साकारलेल्या भूमिकेने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यशश्री अभिनेत्रीबरोबरच रेडीओ जॉकीदेखील आहे. ‘टुकटुक राणी’ या नावाने ती लोकप्रिय आहे. (marathi actress new movie)
====
हे देखील वाचा – नम्रता संभेरावची लेक रुद्राजसाठीची खास पोस्ट चर्चेत
====
यशश्री नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडीओजमुळे चर्चेत असते. बराच काळ चित्रपटसृष्टीपासून लांब राहिल्यानंतर यशश्रीने पुन्हा एकदा सिनेसृष्टीकडे आपली पावलं वळविली आहेत. यशश्री मोठ्या पडद्यावर झळकणाया सज्ज होत आहे. अद्याप ती कोणत्या चित्रपटात झळकणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. यशश्री सोबत या चित्रपटात अजिंक्य देव आणि तेजश्री प्रधानला पाहणं रंजक ठरणार आहे. या चित्रपटात यशश्री नेमकी कोणती भूमिका साकारणार याकडे आता चाहत्यांच्या नजरा वळल्या आहेत.