बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वाने नुकत्याच साऱ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन विजेतेपदाचा मानकरी ठरला. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. यांत पुण्याच्या एमसी स्टॅनने बाकी मारली असून शिव ठाकरेने उपविजेता पदावर समाधान मानले आहे. शिव ठाकरेने बिगबॉस हिंदीचे विजेतेपद जिंकले नसले तरी प्रेक्षकांची मन मात्र त्याने जिंकली आहेत. (Shiv Thakare new partner)
बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चे विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असे झाले नाही. अखेरच्या क्षणी एमसी स्टॅनला विजेता घोषित करण्यात आले आणि शिव ठाकरे रनरअप ठरला. तरीही शिवची लोकप्रियता कमी न होता दिवसेंदिवसवाढतच गेली आहे. अनेक कार्यक्रम, ब्रँड्सच्या जाहिराती सगळ्या गोष्टी शिवकडे मोठ्या प्रमाणात चालून आल्या आहेत. शिवच्या मेहनतीचं फळ त्याला आता मिळालं आहे. नुकतीच त्याने टाटा हैरीअर ही नवी कोरी गाडी घेतली आहे. आयुष्याच्या प्रवासात जणू त्याला नवीन साथीदारच मिळाला असल्याचे शिव कडे पाहून वाटत आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
=====
हे देखील वाचा – महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री
=====
शिवच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल माहिती हि वेळोवेळी तो शेअर करत असतो. बिग बॉस नंतर नव्या भुमीकेत पाहण्यासाठी त्याचे सगळे चाहते उत्सुक दिसत आहेत.शिवच्या बोलण्यावरून तो ‘खतरो के खिलाडी’मध्ये येणार असल्याची जास्त शक्यता दिसतेय. शिवने दिलेल्या या बातमीने त्याचे चाहते उत्सुक आहेत. लवकरच तो याबद्दल अधिकृत माहिती देणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आता शिव नेमका कोणत्या स्टारसोबत आणि कोणत्या चित्रपटात झळकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवच्या आगामी प्रोजेक्टला घेऊन प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.(Shiv Thakare new partner)