मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने मोडले ‘गदर’ अन् ‘बाहुबली’चे सर्व रेकॉर्ड्स, चार दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 9, 2024 | 11:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Allu Arjun's Pushpa 2 movie broken the records of Jailor, PK, Gadar and Baahubali by earning a total of Rs 529.45 crores in 4 days

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ने मोडले ‘गदर’ आणि ‘बाहुबली’चे सर्व रेकॉर्ड्स, कमावले तब्बल ‘इतके’ रुपये

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २ : द रुल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाले आहेत आणि या चारच दिवसात चित्रपटाने आपलं बजेट वसूल केलं आहे. प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. तेलुगू असो किंवा हिंदी दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी तितकीच गर्दी होत आहे. अल्लू अर्जुन, फहाद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा २’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. २०२१ साली ‘पुष्पाःद राइज’ आला होता. तर आता त्याचा सीक्वेल आला आहे आणि याला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. (pushpa 2 movie box office collection)

या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. ‘पुष्पा २’ने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आणि हा चित्रपट सर्वात मोठी ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट ठरला. यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली आणि चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ९३.८ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी वीकेंड जवळ येताच चित्रपटाने कमाईत वाढ दाखवली आणि पुन्हा १०० कोटींचा आकडा पार केला. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी १४१.५ कोटी रुपयांच्या कलेक्शनसह चित्रपटाने आतापर्यंत एकूण ५२९.४५ कोटी रुपयांची कमाई केली.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ प्रीमियर महिला मृत्यूप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात, अल्लू अर्जुनवरही कार्यवाहीची टांगती तलवार?

‘पुष्पा २’ने बॉलिवूड, हॉलिवूड आणि दक्षिणेतील ‘जेलर’, ‘लिओ’ आणि ‘पीके’ या चित्रपटांच्या कमाईचे रेकॉर्ड मोडले. याशिवाय ‘एव्हेंजर्स एंड गेम’च्या कमाईचाही रेकॉर्ड मोडला. तसंच भारतातील ‘दंगल’ या चित्रपटाच्या आजीवन कलेक्शनलादेखील  (३८७.३८कोटी) मागे टाकले. या चित्रपटाने केवळ वर उल्लेख केलेल्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डच तोडले नाही तर ‘अवतार द वे ऑफ वॉटर’चे (३९१.०४) कोटी रुपयांचे रेकॉर्डदेखील तोडले. तसंच ‘सालार’चा पहिला भाग, ‘रोबोट’चा दुसरा भाग आणि बाहुबली (४२१ कोटी रुपये) या चित्रपटांच्या कलेक्शनलाही मागे टाकलं आहे.

आणखी वाचा – भारतात परतल्यानंतर ममता कुलकर्णीची गौतम बुद्धांच्या प्रवासाशी तुलना, म्हणाली, “माझ्या आध्यात्मिक मार्गावर…”

दरम्यान,‘पुष्पा २’ हा दिग्दर्शक सुकुमार यांच्याच ‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे, जो २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भागही जाहीर झाला आहे. तिसऱ्या भागाचे नाव ‘पुष्पा ३ द रॅम्पेज’ असणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्याही भूमिका आहेत.

Tags: allu arjun pushpa 2 moviepushpa 2 collectionspushpa 2 movie box office collection
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Ankita Walavalkar and Dhananjay Powar

"तुझ्याबरोबरच तुझ्या कुटुंबालाही मी मानतो अन्…", डीपी-अंकिता वालावलकरची घट्ट मैत्री, एकमेकांशी साथ, मैत्रीची सोशल मीडियावर तुफान चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.