Bhool Bhulaiyaa 3 FIRST Review : अनीस बज्मीचा ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रपटावर चाहत्यांच्या पहिल्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि लोक हॉरर-कॉमेडी पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसत आहे. कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट टाळ्या मिळवत आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला फर्स्ट हाल्फमध्ये चाहते रुह बाबाच्या भूमिकेत कार्तिकची प्रशंसा करत आहेत आणि विद्या बालनने देखील प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित केले आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की, “कार्तिक रुह बाबाच्या भूमिकेत स्थिरावत आहे. विद्या बालन अप्रतिम आहे. चाहत्यांनी दिवाळीमध्ये मनोरंजन म्हणून हा चित्रपट आवर्जून पाहावा”. ‘चित्रपटातील हास्य आणि थरार यांचा समतोल कसा परफेक्ट होत आहे याचे हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे’, असेही अनेकांचे म्हणणे आहे. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे तर तेही विलक्षण आहे. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत, चित्रपटाने PVR, INOX आणि Cinepolis सारख्या थिएटरमध्ये २.०६ लाख तिकिटांची विक्री केली. पीव्हीआर आयनॉक्सने १.६० लाख तिकिटांची विक्री करुन आघाडी घेतली, तर सिनेपॉलीसने ४६,००० तिकिटांची विक्री केली. ‘भूल भुलैया ३’ ने दमदार सुरुवात केली आहे, त्यानंतर तो सिंघमला पुन्हा टक्कर देऊ शकतो.
This time am gonna scream more for you Rooh Baba🤙🥹
— Shrinivas jambagi (@ShreenivasJamb2) November 1, 2024
So so excited man!! A sleepless night!! Ufff.. 🤞🥹
Jaldi subah ho jaaaoooo 🫶#BhoolBhulaiyaa3 #YehDiwaliBhoolBhulaiyaaVaali #KartikAaryan @TheAaryanKartik pic.twitter.com/qUM8ffaZZG
टीझर व ट्रेलरपासून ते गाणी धडकी भरवणाऱ्या प्रोमोपर्यंत, ‘भूल भुलैया ३’ ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहेत. चित्रपटाचे प्रमोशन पाहता, हे सर्व काही प्रेक्षकांवर अवलंबून असले तरी २५ कोटी ते ३० कोटी रुपयांच्या कमाईने सुरुवात होऊ शकते असे दिसते. ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ सारख्या चित्रपटांमुळे भारतात हॉरर-कॉमेडी बूम दरम्यान हे रिलीज झाले आहे. ‘भूल भुलैया ३’ ला लोकांचे प्रेम मिळाले तर तो बॉक्स ऑफिसवर मजबूत आकडे सादर करु शकतो. एकट्या भारतात चित्रपटाचे कलेक्शन पहिल्या आठवड्यात ८०-९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, घरी आली लक्ष्मी, म्हणाली, “१४ वर्षांच्या प्रयत्नानंतर…”
X वर आलेल्या प्रतिक्रयेनुसार एका चित्रपटात विद्या, माधुरी आणि तृप्ती यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत. थिएटर सोडल्यानंतर लोक त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे मनोरंजक असेल.