बुधवार, जून 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीची तरुण वयातच आत्महत्या, Whatsapp वरील शेवटची पोस्ट व्हायरल, मृत्यूचे दिले होते संकेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amrita Pandey Death

धक्कादायक! सुप्रसिद्ध अभिनेत्रीची तरुण वयातच आत्महत्या, Whatsapp वरील शेवटची पोस्ट व्हायरल, मृत्यूचे दिले होते संकेत

भोजपुरी अभिनेत्री अन्नपूर्णा उर्फ अमृता पांडे हिचा २७ एप्रिल रोजी बिहारमधील भागलपूर येथील राहत्या घरी मृत्यू झाला. अभिनेत्रीने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अमृताला बऱ्याच दिवसांपासून चित्रपटात काम मिळत नव्हतं, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती आणि म्हणूनच तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी अभिनेत्रीने तिच्या व्हॉट्सअप अकाउंटवरुन एक गहन विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली होती. अभिनेत्रीच्या मृत्यूचा पोलीस तपास करत आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या मृत्यूचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही. भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा बिहारमधील भागलपूर येथील अपार्टमेंटमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. जोगसर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Amrita Pandey Death)

घटनास्थळाची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडून तपासणी करण्यात आली. घटनास्थळावरून गळ्यातील साडीचा फास, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहेत. तिच्या कुटुंबातील सदस्यांनुसार, अभिनेत्रीने भोजपुरी व हिंदी दोन्ही भाषेत अनेक चित्रपट, मालिका, वेबसिरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. ‘आयुष्य दोन बोटींवर चाललं आहे, मी माझी बोट बुडवून मार्ग सुकर केला’, असं व्हॉट्सॲप स्टेटस आत्महत्येपूर्वी अमृताने ठेवलं होतं. दरम्यान, जोगसर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २७ एप्रिल रोजी संध्याकाळी अभिनेत्रीच्या आत्महत्येची माहिती मिळाली. स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) कृष्ण नंदन कुमार सिंग, SI राजीव रंजन आणि शक्ती पासवान काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. बेडवर तिचा मृतदेह सापडला.

आणखी वाचा – ठरलं तर मग! सायली, अर्जुन व चैतन्य मिळून साक्षीला शिकवणार धडा, नवा डाव आखत अद्दल घडवणार अन्…

पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा कुटुंबीयांनी सांगितले की, अमृताची बहीण दुपारी ३.३० वाजता तिच्या खोलीत गेली. तेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी फास कापून तिला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अमृताच्या कुटुंबीयांनी असेही सांगितले की, अभिनेत्रीने २६ एप्रिल रोजी तिची बहीण वीणाच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी तिने खूप धमाल, मस्तीही केली. तिला हे कठोर पाऊल कशामुळे उचलावे लागले हे कोणालाही समजत नाही आहे.

आणखी वाचा – लग्नाचा बाजार! राखी सावंत व तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश पुन्हा एकत्र, आदिल खानला सुनावलं, त्याच्या बायकोलाही दिला सल्ला

अमृताचा विवाह चंद्रमणी झांगड या ॲनिमेशन इंजिनीअरशी झाला. अभिनेत्रीचा नवरा सध्या मुंबईत राहत आहे. त्यांना मूलबाळ नाही. तिच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, अमृता तिच्या करिअरबद्दल खूप चिंतेत होती. ती खूप नैराश्यात होती आणि तिच्यावर याबाबत उपचारही सुरु होते. भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त अमृता एका वेब सीरिजमध्येही काम करत होती. तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Tags: amrita pandeyAmrita Pandey Deathamrita pandey sucidebhojpuri actressentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Nikhil Chavan And Anushka Sarkate Wedding
Entertainment

Photo : अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची लगीनघाई, सहकलाकारांकडून केळवण साजरं, सोशल मीडियावर चर्चा

जून 10, 2026 | 10:34 am
mangesh desai the maharashtra files
Entertainment

सत्य मांडण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी; ‘द महाराष्ट्र फाईल्स’ रिलीजसाठी सज्ज, १२ जूनपासून जवळच्या चित्रपटगृहात

जून 9, 2026 | 10:59 am
Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
Next Post
Paaru Serial Promo

पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.