‘भाग्य दिले तू मला’ ही मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेतील राज व कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं. तर याव्यतिरिक्त सानिया, रत्नमाला, आदित्य या पात्रांनाही तितकीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत सानिया या पात्राने अगदी चपखल अशी खलनायिकेची भूमिका साकारली. ही भूमिका अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने साकारली होती. (Amit Rekhi On Jahnavi Killekar)
जान्हवीने सानिया हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता सध्या जान्हवी ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. जान्हवीने मालिकेत साकारलेलं सानिया या पात्राचा नवरा आदित्य म्हणजेच अमित रेखी याने देखील जान्हवीचा ‘बिग बॉस’मधील खेळ पाहून तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांचा मालिकेतील एक सीन त्याने पोस्ट केला आहे.
अमितने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो तिला जे काय करत आहे ते डोकं लावून कर, असा सल्ला देत आहे. “आदित्य पण बिग बॉस पाहतोय बर का…सानिया”, असं म्हणत त्याने त्यांचा मालिकेतील संभाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत. तर जान्हवीचा ‘बिग बॉस’ मधील वावर पाहून अनेकांना या व्हिडीओतील म्हणणं पटलं असल्याचंही दिसत आहे.
या व्हिडीओवर अदिती द्रविडने कमेंट करत, “इतकं अचूक कसं जमलं?”, असं म्हटलं आहे. तर यावर अमितने कमेंट करत, “आपोआप जमून येतं. काय आता”, असं म्हटलं आहे. तर यावर योगिता चव्हाणचा नवरा सौरभ चौघुलेने कमेंट करत, “वाट बघत आहे बाईईईईई जरा जमलं तर बघ”, असं म्हटलं आहे यावर अमितने “शोधावं लागेल”, असं म्हटलं आहे. यावर पुन्हा सौरभने कमेंट करत, “अमित खूप हसलो”, असं म्हटलं त्यावर अमितने प्रतिउत्तर देत, “अरे अचानक दिसला ते हा व्हिडीओ”, असं म्हटलं आहे.