मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनातील एक घटक झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांमध्ये सध्या चांगलीच चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनी वरील भाग्य दिले तू मला. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीवस उतरत असून राज कावेरी ही जोडी प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे.(Ratnmala Get Injured)
सध्या मालिकेमध्ये अनेक चढ उतारांनंतर राज कावेरी एकत्रितपणे संकटाना सामोरं जात आहेत. रत्नमाला म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ युआनचे राज कावेरीला भक्कम साथ असल्याचं देखील पाहायला मिळतंय. मालिकेच्या येणाऱ्या भागात राज कावेरीयांनी उभारलेला माहेरचा नवीन चहा सुद्धा अनेक संकटात सापडत आहे असच आणखी एक संकट आता माहेरच्या नवीन चहावर आलेलं दिसतंय.

जखमी झाल्या रत्नमाला..
भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात तात्या मुंबईहून गावी येतात, आणि कावेरीच्या. बहिणीला, कावेरी किती आनंदात असल्याचं सांगतात. तात्यांचे डोळे भरून येतात, कावेरी खूप आनंदी असल्याचं ते कावेरीच्या आईला सांगतात. तर इकडे सुदर्शन दोन लोकांना काम नीट करण्याची धमकी देत असतो. तितक्यात तिथून बच्चू मामा जात असतात त्यांचा धक्का लागतो तर ते सॉरी असं बोलून आपल्या कामाला निघतात. (Ratnmala Get Injured)
हे देखील वाचा – ‘मुलं लहान असताना त्यांच्यासोबत वेळ घालवणं, लाड करणं कधी प्रसादला जमलंच नाही पण ….’
तेव्हा सुदर्शन मनात बोलतो, ज्या टपरीसाठी सामना आणायला इतक्या घाईत जातोय. ती टपरीच नाही उरली तर काय करणार त्या समानच. त्यानंतर ते दोन गुंड सुदर्शनच्या सांगण्यावरून टपरीवर जाऊन राडा करतात आणि तोडफोड करतात, एक जण रत्नमाला याना जोरात ढकलतो. तेव्हा त्यांच्या डोक्याला लागत आणि रक्त ही येत, तितक्यात राज आणि कावेरी समोरून येतात आणि हे सार पाहून त्यांना धक्का बसतो.
तर आता मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.