भाग्य दिले तू मला ही मालिका सध्या प्रेक्शनच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. मालिकेतील राज कावेरीचं एकमेकांवरच प्रेम पाहून ही जोडी प्रेक्षकांच्या अगदी जवळची बनली आहे. कावेरीच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत राज आता पर्यंत तिच्या सबत असल्याचं पाहायला मिळालंय. मालिकेत सध्या असंच एक प्रसंग पाहायला मिळतोय जिथे कावेरीच्या धीर खचतो त्यावेळी सुद्दा राज पुन्हा तिच्या सोबत उभा राहतो आणि तिला धीर देतो.(Raj Kaveri Relation)
माहेरचा चहा सानिया आणि वैदेही ने हिसकावून घेतल्या नंतर कावेरीने पुन्हा नव्या जोमाने नवीन माहेरचा चहा सुरु केला. टपरीपासून सुरु केलेला कावेरीचा नवीन माहेरचा चहा आता कॅफे पर्यंत जाऊन पोहचला पण या नावाच्या वादावरून पुन्हा एकदा कावेरीचं मानसिक खच्चीकरण झाल्याचं मालिकेच्या आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि यावेळी राज पुन्हा एकदा कावेरीला सगळं ठीक होईल यासाठी धीर देताना पाहायला मिळतोय.
आजच्या भागात राज कावेरीच्या नात्यावर उचललेल्या प्रश्नावर कावेरी भावुक झाली आहे. कावेरी भावुक होऊन राजला सांगते आप्लयानात्यावर कोणी बोट उचललेलं मला आवडणार नाही. तर आता मालिकेच्या पुढच्या भागात काय घडणार? राज कावेरी सानिया वैदेहीला कसे पराभूत करणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे .(Raj Kaveri Relation)