लहानपण असो वा मोठंपण विरंगुळा म्हणून आपण कार्टून पाहतो. लहानपणापासून आपल्याला एका कार्टूनने मोठं होईपर्यंत खुर्चीत खिळवून ठेवलंय, ते म्हणजे स्पायडरमॅन. जाळ्यांवर लटकत वेगाने प्रवास करणारा आणि गरजूंची मदत करणारा ‘स्पायडरमॅन’ आपल्या सर्वांना माहित आहेच. ‘स्पायडरमॅन’चा जगभरात खूप मोठा चाहता वर्ग आहे.(spiderman across the spider verse)
अशातच ‘स्पायडरमॅन’चा नवीन चित्रपट ‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या भाषेत डब करण्यात आला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘स्पायडरमॅन’ हा स्पायडरमॅनचा मराठी भाषेत डब झालेला आणि चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आलेला पहिला चित्रपट आहे. मराठीत डब झालेल्या या हॉलीवूडपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक व अभिनेता असलेल्या सचिन सुरेश या मराठामोळ्या चेहऱ्याने सांभाळली आहे.
पाहा ‘स्पायडरमॅन’च्या आवाजामागे कोण आहे मराठमोळा चेहरा (spiderman across the spider verse)
रेडिओ जॉकी, डबिंग या प्रवासात स्वतःला सिद्ध केल्यानंतर ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडरव्हर्स’ या अॅनिमेशनपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एका मोठ्या हॉलीवूडपटाच्या प्रोजेक्टचा भाग होता आल्याचा आनंद सचिन सुरेश याने व्यक्त केला. ‘प्राईम फोकस टेक्नॉलॉजी’ ने माझ्यावर विश्वास दाखवत ही संधी मला दिली, माझ्यासाठी हा वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव होता. डबिंग ते मिक्सिंग अशी सर्व जबाबदारी सांभाळत महिन्याभरात आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण केल्याचे सचिन यांनी म्हटलं आहे.(spiderman across the spider verse)
हे देखील वाचा – संदीप पाठकचा नवा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस
‘स्पायडरमॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात विविध देशांतील ‘स्पायडरमॅन’चे अवतार पहायला मिळत असून सोबत त्याच्या भारतीय अवताराची झलकही या चित्रपटात पहायला मिळते आहे. पवित्र प्रभाकर भारतीय स्पायडरमॅनच्या भूमिकेत असून त्याचा मराठमोळा आवाज पंकज खामकर याने डब केला आहे.