Balika Vadhu actress wedding : टेलिव्हिजन अभिनेत्री अविका गौर आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चांदवानी काल ३० सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. कलर्स टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘पती पत्नी आणि पंगा’ या शोच्या सेटवर या जोडप्याचे लग्न झाले. ज्या चॅनेलमुळे अविकाला प्रसिद्धी मिळाली त्यावरच तिने लग्न करण्याची घोषणा केली. ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे अविकाला खऱ्या अर्थाने प्रसिद्ध मिळाली. आजही तिला याच मालिकेतील भूमिकेसाठी ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी अविका लग्नामुळे चर्चेत आली होती. आणि अखेर तिने तिचा प्रियकर मिलिंद चांदवानीसह लग्न केलं.
काही दिवसांपासून ती या वाहिनीवरील ‘पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामध्ये हिंदी टेलिव्हिजनवरील इतरही अनेक सेलिब्रिटी कपल्सनी सहभाग घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवरच अविका व मिलिंद यांचं लग्न पार पडलं. हळद आणि मेहंदीच्या विधीनंतर, काल या जोडप्याने त्यांच्या कुटुंबाच्या आणि शोच्या इतर स्पर्धकांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. यापूर्वी, तिच्या वरतीच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, आता शेवटी दोघांनी त्यांची छायाचित्रे पती -पत्नी म्हणून देखील शेअर केली आहेत.
आणखी वाचा – “आज एक महिना झाला”, प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची पहिली पोस्ट, म्हणाला, “मनं पोखरलं आहे आणि…”
लग्नाच्या निमित्ताने, अविकाने लाल रंग सुंदर लेहेंगा घातला होता ज्यासह तिने हिरव्या रंगाचे दागिने परिधान केले होते. त्याच वेळी, मिलिंदने बेज कलर आउटफिट निवडले. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या फोटोमध्ये हे जोडपे पती -पत्नीच्या सेटवर खूप आनंदित दिसत आहेत. या शोचे संपूर्ण कास्ट आणि सेलिब्रिटी अतिथी पती -पत्नी आणि पंगाच्या सेटवरील समारंभात उपस्थित होते. यामध्ये सोनाली बेंद्रे, हिना खान, रॉकी जयस्वाल, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी, रुबिना दिलिक, अभिनव शुक्ला, ममता लाहिरी, सुदेश लाहिरी, स्वरा भास्कर, फहाद अहमद, इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांचा समावेश होता.
आणखी वाचा – अखेर जयंतच सत्य समोर, जान्हवी घेणार मोठा निर्णय; तर सिद्धू होणार किडनॅप, मोठा ट्विस्ट
राखी सावंत, फराह खान, कृष्णा अभिषेक आणि बिग बॉस 17 चा समर्थ जुरेल देखील पाहुणे म्हणून सामील झाला होता. माध्यमांशी बोलताना अविका गौर तिचा आनंद व्यक्त करत म्हणाली, “असे काही दिवस आहेत जेव्हा मी उठते आणि स्वत: ला आठवण करून देते की ते खरे आहे. मी खूप भाग्यवान आणि स्वत: ला आशीर्वादित समजते की मला एक जोडीदार सापडला जो मला आधार देतो, मला समजतो आणि नेहमीच मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो”. ती पुढे म्हणाली, “मी नेहमीच माझ्या पालकांना सांगायचे, मी एकतर कोर्टात लग्न करीन, जे कोणालाही कळणार नाही किंवा मी एक भव्य लग्न करीन, जे संपूर्ण जग साजरे करेल. जणू माझे बालपणीचे स्वप्न सत्यात उतरत आहे”.





