सध्या एकाच चित्रपटाची सर्व ठिकाणी चर्चा पाहायला मिळते,तो म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं आहे.’सैराट’ आणि ‘वेड’ नंतर आता ‘बाईपण भारी देवा’ बॉक्सऑफिसवर दमदार कमाई करून नवीन रेकॉर्ड तयार करत आहे.सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर,रोहिणी हट्टंगडी आणि वंदना गुप्ते या अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाची भुरळ प्रेक्षकांना घातली.(baipan bhari deva actress sukanya mone)
एक महिन्यानंतरही चित्रपट त्याच जोमाने सुरु आहे. महिला वर्गाने तर या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. महिलांनी मोठ्या ग्रुपने जाऊन चित्रपट पाहिला. तर, चित्रपटानंतर गाण्यांवर स्त्रिया थिरकल्या देखील.३ तास सर्व गोष्टी बाजूला ठेवून प्रेक्षकांनी मनमुरादपणे चित्रपटाचं आनंद घेतला ही कौतुकाची बाब आहे.
८० वर्षाच्या आजींसोबत सुकन्या मोनेंनी घातली फुगडी (baipan bhari deva actress sukanya mone)
चित्रपटाचं प्रमोशन ही मोठ्या प्रमाणात झालं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील कलाकार स्वतः चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटले. सध्या चित्रपटाची टीम कोल्हापुरात आंबाबाईच्या दर्शनाला गेलेली पाहायला मिळाली. तिकडचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले. परंतु सध्या सुकन्या मोनेंचा ८० वर्षाच्या एका आजींसोबतचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ वायरल होतो आहे. थिएटर बाहेर अगदी उत्साहात त्या आजी आणि सुकन्या मोने फुगडी खेळताना पाहायला मिळाल्या.(baipan bhari deva actress sukanya mone)
या व्हिडिओमधील आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्या नंतर कलाकाराला आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं नक्कीच वाटले. प्रत्येक वयोगटापर्यंत सिनेमा पोहचला आहे आणि प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला तो सिनेमा आपलासा वाटतो आहे. ही चित्रपटाच्या यशाची पोचपावती आहे. अभिनेत्री सुकन्या मोने या कायमच उत्साही असतात. नुकतीच चित्रपटाची Success Party पार पडली त्या पार्टी मधील सुकन्या मोनेंच्या डान्सने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली.
हे देखील वाचा : ‘हैराण केलंय बायकांनी’…राजस्थान मध्ये १५० बायकांनी भांडण करत केली ‘बाईपणच्या’ शोची मागणी