मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची जोरदार हवा आहे, ती म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित “बाईपण भारी देवा”. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना झाला, पण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. बाईपण भारी देवाने आतापर्यंत ७० कोटींची कमाई केली असून कमाईचे अनेक रेकॉर्डस् आपल्या नावावर करत आहे. (baipan bhari deva)
एकीकडे बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड, हॉलिवूड व अन्य भाषिक चित्रपट येत असताना प्रेक्षक ‘बाईपण भारी देवा’ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देश-विदेशातही बाईपणची क्रेझ कायम आहे. अनेक सिनेमागृहांवर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागलेले आहे. अशातच या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरु झाली असून दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
काय म्हणाले दिग्दर्शक केदार शिंदे ‘बाईपण २’ बद्दल… (baipan bhari deva 2)
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये केदार शिंदे यांच्यासोबत लेखिका वैशाली नाईक आणि दिग्दर्शक ओमकार मंगेश दिसत आहेत. मात्र त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. केदार यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय, “एक कहानी खतम तो दुजी शुरु हो गयी मामू.. बाईपण भारी देवा नंतर.. काहीतरी भारी.. #बाईपणभारीदेवा #somethingnew #whatscooking”. केदार यांच्या या पोस्टवरून बाईपणचा दुसरा भाग येणार का ? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (baipan bhari deva 2)
केदार यांच्या या पोस्टवर अभिनेत्री क्रांती रेडकरने “Waiting ????????????????” तर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी “Hummmm” अशी कमेंट केली आहे. शिवाय चाहतेही बाईपणच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे कमेंट्समधून म्हणत आहे.


अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांच्या उत्तम अभिनय व केदार शिंदे यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनामुळे चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरु आहे. मराठी चित्रपट इतिहासात अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड ‘बाईपण भारी देवा’ मोडणार, असं चित्र सध्या दिसतंय. (baipan bhari deva 2)
हे देखील वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची INSIDE STORY आली समोर, खऱ्या सहा बहिणी आल्या समोर
