बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच त्याचा आगामी ‘ड्रीम गर्ल २’ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘ड्रीम गर्ल’च्या सिक्वेल असलेल्या या सिनेमाचे अनेक पोस्टर्स व टिझर रिलीज झाले. आता नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाचे ट्रेलर रिलीज होताच अवघ्या काही तासांतच १५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. (Dream Girl 2 Trailer)
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान स्त्री वेशात दिसत असून त्याचा मजेशीर अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिनेमाचे संपूर्ण कथानक ‘पूजा’ या पात्रावर आधारित असून पहिल्या भागात आयुष्मान स्त्रीच्या आवाजात लोकांशी बोलत असतो. तर दुसऱ्या भागात आयुष्मान चित्रपटात स्त्रीवेश परिधान करून पूजाचे पात्र साकारतो.
पाहा सिनेमाचा ट्रेलर… (Dream Girl 2 Trailer)
ट्रेलरमध्ये आयुष्मान कर्जबाजारी झाल्यामुळे पुन्हा एकदा तो पूजाचा स्त्रीवेश परिधान करून गाणी गाण्यास, फोनवर बोलण्यास सुरुवात करतो असे दाखवण्यात आले आहे. त्याच्यासह अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अनु कपूर, परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आदी कलाकार देखील यात दिसणार आहेत.
हे देखील वाचा : ‘Loki 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार दुसरा सिझन
२०१९ मध्ये रिलीज झालेला ‘ड्रीम गर्ल’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमाच्या पहिल्या भागाकडून जितकी अपेक्षा होती, तितकीच अपेक्षा दुसऱ्या भागाकडूनही आहेत. राज शांडिल्य दिग्दर्शित हा सिनेमा याआधी २५ जुलैला रिलीज होणार होता. मात्र, काही कारणास्तव आता हा सिनेमा येत्या २५ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. (Dream Girl 2 Trailer)