बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटाच्या ६ वर्षांनंतर बादशाह अडकला लग्नबंधनात, ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे पत्नी

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2026 | 4:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Badshah Second Wedding

बादशाह अडकला लग्नबंधनात

Badshah Second Wedding : बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह नेहमीच चर्चेत असतो. पण सध्या बादशाह पुन्हा एकदा त्याच्या खासगी कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी या दोघांच्या डेटिंगची चर्चा रंगताना पाहायला मिळत होती. याशिवाय दोघांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होत्या. मात्र आता या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. कारण या दोघांनी गुपचूप लग्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी ईशा रिखीची आई पूनम रिखी यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. या पोस्टमध्ये बादशहा आणि ईशा हे पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत. नवविवाहित जोडप्याप्रमाणे त्यांच्या लूकमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे, शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांना वरमाला घालताना तसेच विवाहातील पारंपरिक विधी पार पाडताना दिसत आहेत. या पोस्टखाली ईशाच्या आईने “देवाचा तुमच्यावर आशीर्वाद राहो!” अशी कमेंट केल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.

आणखी वाचा – दिव्यांका त्रिपाठीच्या पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री होणार आई, फोटो शेअर करत म्हणाली, “नवीन सुरुवात…”

View this post on Instagram

A post shared by @groundglobalnews

या सर्व घडामोडींमुळे सोशल मीडियावर चर्चांचा उधाण आलं आहे. चाहते या बातमीवर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण या दोघांना शुभेच्छा देत आहेत, तर काहीजण अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. दरम्यान, या लग्नाबाबत ना बादशहा ना ईशा रिखी यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हे लग्न खरंच झालं आहे की केवळ अफवा आहेत. याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमुळे या चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या १० वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, पारंपरिक अंदाजात केलं डोहाळ जेवण, केसांत गजरा माळला अन्…

Tags: Badshah Second Weddingbollywood newsentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Arman malik and payal malik baby boy

पायल मलिक झाली आई, अरमान मलिक पाचव्यांदा झाला बाबा, मुलगा की मुलगी हे अद्याप गुलदस्त्यात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.