महेश बाबू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. दाक्षिणात्य चाहत्यांमध्ये हा अभिनेता विशेष लोकप्रिय आहे. आजवर अनेक चित्रपटांमधून महेश बाबू यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. महेश बाबू उत्तम अभिनेते असून ती उत्तम कौटुंबिक व्यक्तीदेखील आहे. महेश बाबूचं त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर व दोन्ही मुलांवर खूप प्रेम आहे. महेश बाबूने आपल्या मुलांची खूप साधी व चांगली नावे ठेवली आहेत. अभिनेत्याने आपल्या मोठ्या मुलाचे नाव गौतम असे ठेवले आहे. गौतम हे भगवान गौतम बुद्धांचेही नाव आहे. (Baby Name On Lord Gautam Buddha)
गौतम म्हणजे अंधार दूर करणारा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची नाव भगवान बुद्धांच्या नावावरुन ठेवू शकता. भगवान गौतम बुद्धांना अहिंसा व जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांचा गया येथील बोधीवृक्षाखाली मृत्यू आला. भारताव्यतिरिक्त चीन, थायलंड, ब्रह्मदेश व श्रीलंका येथे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. खाली दिलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या नावावरुन तुम्ही तुमच्या मुलांची नाव ठेवू शकता.
गौतम बुद्धांच्या नावावरुन लहान मुलांची नावे
अनुराक : थायलंडच्या पौराणिक समजुतीनुसार, अनुराक हा पुरुष देवदूत आहे. जर तुमच्या मुलाचे नाव A ने सुरु होत असेल तर तुम्ही हे नाव देऊ शकता.
दीपांकर : दीपांकर हे नाव भारतात खूप प्रचलित आहे. दीपांकर म्हणजे शांततेत कसे जगायचे हे जाणणारा.
राहुल : राहुल हे गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते. भारतात राहुल नावाच्या अनेक व्यक्ती आहेत. या नावाचा मोठ्या प्रमाणात भारतात वापर केला गेला आहे.
अनुमन : अनुमन म्हणजे संयम. हे नाव भगवान गौतम बुद्धांशी संबंधित आहे.
अधिराज : अधिराज म्हणजे सम्राट किंवा महाराजा.
तथागत : हा पाली व संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ जो योग्य मार्गावर चालत आहे. हे भगवान बुद्धांच्या सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक नाव आहे.
अनामी : अनामी हे गौतम बुद्धांचे नाव आहे. हे नाव तुम्ही मुले व मुली दोघांसाठीही ठेवू शकता.
निर्वाण :निर्वाण म्हणजे शून्य अवस्था प्राप्त करणे. म्हणजेच अतिशय शांत. जर तुमच्या मुलाचे नाव N वरुन सुरु होणार असेल तर तुम्ही या नावाचा विचार करु शकता.
अश्वघोष : अश्वघोष हे बौद्ध विचारवंत व तत्त्वज्ञ यांचे नाव आहे.
बोधी : बोधी हा संस्कृत शब्द आहे. बोधी म्हणजे शिक्षण. महात्मा बुद्धांनी बोधी वृक्षाखाली तपश्चर्येला सुरुवात केली होती.