शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आयेशा खानची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत मुन्नवरवर साधला निशाणा, म्हणाली “पिक्चर अजून…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 21, 2024 | 5:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ayesha khan first post after being evicted from bigg boss 17 she says picture abhi baki hai see the details

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आयेशा खानची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत मुन्नवरवर साधला निशाणा, म्हणाली “पिक्चर अजून...”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व बहूचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसचे यंदाचे १७वे पर्व होते. यंदाचे पर्व हे अनेक कारणांनी गाजले याचे मुख्य कारण म्हणजे या शोमध्ये रोजचे वादविवाद व भांडणे. स्पर्धकांमधील रोजचे वादविवाद, मतभेद व भांडणांमुळे यंदाचे ‘बिग बॉस’चे पर्व चांगलेच गाजले. आता हा शो अंतिम टप्प्यात आला असून महाअंतिम सोहळ्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेण्ड का वार’मध्ये या घरातील आयेशा खानचा प्रवास संपला आहे. घरातील सदस्यांसाठी रोस्ट नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात सर्व स्पर्धकांनी घरात आलेल्या प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. सर्व स्पर्धकांच्या कामगिरीवर तेथे उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना मत दिले. या मतदानाच्या आधारे आयेशाला सर्वात कमी मते मिळाले आणि त्यामुळेच आयेशा या घरातून बाहेर पडली.  

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच आयेशाने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “बिग बॉसचा हा प्रवास माझ्यासाठी कठीण होता. तसेच या शोदरम्यान, भावनांची पराकाष्टा झाली. परंतु तुम्ही (चाहत्यांनी) दिलेले प्रेम व पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. तुमच्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हते. तुमच्या प्रेमाबद्दल मी तुमची कृतज्ञ व ऋणी आहे.”

आणखी वाचा – लेकीच्या लग्नानंतर आमिर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या मित्राचे अपघाती निधन, अभिनेत्याला शोक अनावर

तसेच यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी माझं आयुष्य तुमच्या हातात सोपवलं आहे. त्यामुळे मला फक्त आता तुमच्या प्रेमाची गरज आहे.” असंही म्हटलं आहे. दरम्यान, यापुढे आयेशाने लिहिलेल्या वाक्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आयेशाच्या “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त (पिक्चर अजून बाकी आहे)” या वाक्यावर साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

आणखी वाचा – “इतिहास नीट सांगितला… ”, ‘प्रोपगंडा’ चित्रपटांबद्दल मनोज जोशींचं परखड मत, म्हणाले “त्यात काही गैर…”

दरम्यान, आयेशाने हे वाक्य खास मुन्नवरसाठी लिहिले असल्याचा अंदाज नेटकऱ्यांकडून वर्तवला जात आहे. आयेशाने घरात येताच ती मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटली होती. यानंतर घरात अनेकदा आयेशाने मुन्नवरबरोबर वाद घातले असल्याचेही पाहायला मिळाले. पण नुकताच तिचा या घरातील प्रवास संपला आहे. हा प्रवास संपला असला तरी भविष्यात आयेशा मुन्नवरबाबत खुलासे करणार असल्याचे या पोस्टवरुण् वाटत आहे.      

Tags: ayesha khanbigg bossbigg boss 17bigg boss 17 newsbigg boss newsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsआयेशा खानबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bollywood actress kangana ranaut reached at ayodhya and sweeping in the temple video viral on social media

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत रामजन्मभूमीत दाखल, अयोध्येत पोहोचताच पार पाडले होमहवन व पूजा, नंतर झाडूही मारला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.