शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“देवा माझ्या या डार्लिंगला…”, रुग्णालयातून घरी आलेल्या अमोल बावडेकरच्या भेटीला अविनाश नारकर, आता परिस्थिती कशी?  

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 21, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Avinash Narkar meet amol bawdekar

“देवा माझ्या या डार्लिंगला…”, रुग्णालयातून घरी आलेल्या अमोल बावडेकरच्या भेटीला अविनाश नारकर, आता परिस्थिती कशी?

कलाकारांचं कलेवर असणारं प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा नक्की काय असते? हे सुप्रसिद्ध अभिनेता अमोल बावडेकरने सगळ्यांना दाखवून दिलं. काही दिवसांपूर्वीच ‘सुंदर मी होणार’ नाटकाच्या प्रयोगाआधी अमोलच्या बाबतीत एक वेगळीच घटना घडली. प्रयोगापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. मात्र या संपूर्ण घटनेमध्ये त्याचं कलेवर असणारं प्रेम तो विसरला नाही. नाटकाचा प्रयोग रद्द होऊ नये म्हणून अमोलने डॉक्टरांकडे चक्क तीन तास मागितले. मात्र त्याची परिस्थितीच गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी त्यासाठी नकार दिला. यामधून अमोलची त्याच्या कामाप्रती असलेली निष्ठा, प्रेम दिसून आलं. आता तो रुग्णालयामधून घरी परतला आहे. (Avinash Narkar meet amol bawdekar)

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अमोलला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. परिस्थिती पाहता अँजिओग्राफी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. अँजिओग्राफी झाल्यानंतर अमोल पुन्हा सुखरुप घरी परतले आहेत. ‘सुंदर मी होणार’ नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी अमोलबाबत संपूर्ण माहिती दिली होती. आता अमोलला भेटण्यासाठी अभिनेते अविनाश नारकर त्यांच्या घरी गेले होते. यादरम्यानचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला.

आणखी वाचा – “आमच्या हमरेको तुमरेकोमुळे समाज हिंदी…”, हिंदी भाषेच्या सक्तीवर समीर चौघुलेंची पोस्ट, म्हणाले, “समाजात जे दिसतं…”

अविनाश त्यांचा मित्र अमोलला भेटण्यासाठी घरी पोहोचले. यावेळी त्यांनी अमोल अगदी ठणठणीत असल्याचं सांगितलं. अविनाश म्हणाले, “बघताय ना अमोल अगदी मस्त, ठणठणीत आणि बरा आहे. आता १ जुलैपासून तो पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे. मगाशी तो इतका हसत होता की, त्याची पत्नी त्याला ओरडली. बस्स आता सांगितलं”. अविनाश यांनी अमोलच्या तब्येतीबाबतची खुशखबर चाहत्यांनाही दिली.

आणखी वाचा – ‘येरे येरे पैसा ३’च्या टायटल साँगचे सलमान खानकडून कौतुक, चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि…

तसेच व्हिडीओला त्यांनी एक सुंदर कॅप्शनही दिलं. “देवा माझ्या या डार्लिंगला कोणाचीही नजर लागू देऊ नकोस”. अमोल आणि अविनाश दोघंही अगदी खास मित्र आहेत. ‘सुंदर मी होणार’ नाटकाचे प्रयोग अमोल पुन्हा नव्या जोमाने करणार आहे. तर झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ मालिकेतही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. पण सध्या काही दिवस अमोल घरी आराम करणार आहे.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Ajinkya Raut On Tushar Ghadigaonkar suicide

"९ लाख अजूनही निर्मात्याने दिलेच नाहीत आणि…", कलाकाराने आत्महत्या करण्यावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.