सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“९ लाख अजूनही निर्मात्याने दिलेच नाहीत आणि…”, कलाकाराने आत्महत्या करण्यावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट, म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 21, 2025 | 4:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ajinkya Raut On Tushar Ghadigaonkar suicide

"९ लाख अजूनही निर्मात्याने दिलेच नाहीत आणि…", कलाकाराने आत्महत्या करण्यावरुन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट, म्हणाला…

Ajinkya Raut On Tushar Ghadigaonkar suicide : अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडीगांवकरच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीत खळबळ पसरली आहे. तुषारने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. तुषारच्या आत्महत्येची माहिती अभिनेता अंकुर वाढवेने पोस्टद्वारे दिली. तुषारच्या आत्महत्येची बातमी समोर येताच चाहत्यांना आणि कलाकारांनाही धक्का बसला. निधनाच्या बातमीवर सिनेविश्वातील कलाकार मंडळी त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्याचा हा आत्महत्येचा निर्णय मात्र अनेकांना खटकला. यावर आता मराठी मालिकाविश्वातील अभिनेता अजिंक्य राऊतनेही भाष्य केलं आहे. अजिंक्यने आत्महत्या हा पर्याय नाही असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि थकबाकी करणाऱ्या निर्मात्यांसाठी नियम लागू करण्याची विनंती केली आहे.

अजिंक्यने व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “कलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम मिळवणं, टिकून राहणं, पहिलं काम मिळवणं, एकापाठोपाठ काम मिळवणं हे फार कठीण आहे. सुदैवाने असं जे लोक करत आहेत त्यांचं खरंच कौतुक आहे. कलाकार म्हणून काम मिळत नाही आहे या कारणाने एका कलाकाराने आत्महत्या केली हे जेव्हा कानावर येत तेव्हा एक कलाकार म्हणून जीव हळहळतो. आणि काम मिळत नसणं हे एक कारण आहेच पण ज्या लोकांनी काम मिळवून मनापासून मेहनत करुन, दिवसरात्र मेहनत करुन, कुटुंबापासून दूर राहून, मोठ्या शहरांमध्ये येऊन स्वतःच नाव बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. माझं स्वतःच उदाहरण द्यायचं झालं तर पेशाने मी इंजिनियर असताना स्वेच्छेने मी अभिनय क्षेत्रात आलो. निर्माते जेव्हा पैसे देत नाहीत, माझे किती लाख रुपये अजून दिले नाही आहेत वगैरे याबाबत मी आता काहीच सांगत नाही आहे. कारण जवळजवळ वर्ष उलटलं आहे आणि अजूनही मी वाटच पाहत आहे”.

आणखी वाचा – मराठी अभिनेत्याचं टोकाचं पाऊल, काम मिळत नसल्यामुळे आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Valmik Raut (@ajinkyathoughts)

पुढे त्याने म्हटलं की, “अगदीच सांगायचं झालं तर नऊ लाख रुपयांपेक्षा येणं मला बाकी आहे. जी माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मुलासाठी मोठी गोष्ट आहे. तर एखाद्याने टोकाची भूमिका घेईपर्यंत वा त्याने आत्महत्या करेपर्यंत वाट पाहू नये. यावर सरकारने, मनोरंजन विश्वाच्या एखाद्या टीमने काहीतरी नियम लागू करावेत. त्यांना कोणी जाब विचारणारी व्यक्ती आता नाहीच. त्यामुळे असा एकदा त्यांच्यावर जरब बसवणारा नियम लागू व्हावा. कलाकाराच्या मेहनतीचे पैसे हे त्याला मिळावेत. पैसे न दिल्याने आत्महत्या केल्यानंतर वर्ष वर्ष हळहळ व्यक्त करत बसतात. अर्थात आत्महत्या हा पर्याय नाहीच आहे आणि तो नसावा. आयुष्य इतकं स्वस्त नाही आहे”.

आणखी वाचा – कॅन्सर, घटस्फोट, डिप्रेशनसारख्या कठीण काळात योगचा कलाकारांना मोठा आधार, उत्तम पर्याय निवडला कारण…

तर या व्हिडीओखाली कॅप्शन देत त्याने लिहिलं, “माझे ९ लाखांहून अधिक रुपये निर्मात्याने अद्याप दिलेले नाहीत. मला माहिती आहे की, आत्महत्या हा पर्याय नाही पण कृपया कलाकाराला आत्महत्या करण्याचा विचार करण्यास भाग पाडले जाईपर्यंत वाट पाहू नका. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आजकाल निर्माते कलाकारांना दिलेल्या वचनानुसार पूर्ण रक्कम देत नाहीत. माझे ९ लाखांहून अधिक रुपये प्रलंबित आहेत (प्रोडक्शनने अद्याप दिलेले नाहीत). आणि माझ्यासारख्या लहान शहरातून आणि मध्यमवर्गीय कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात टिकून राहण्यासाठी ही एक मोठी रक्कम आहे आणि माझ्यासाठी उपयुक्त आहे. मनोरंजन उद्योगात निर्मात्यांना सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे सर्व मानधन (पैसे) द्यावे लागण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय आणि कठोर नियम आवश्यक आहेत. मी अद्याप कोणाचेही नाव घेऊ इच्छित नाही पण गेल्या एक वर्षापासून देयकाची वाट पाहत आहे. कृपया आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सर्व वरिष्ठ आणि समर्थक, या निर्मात्यांसाठी काही कठोर नियम स्थापित करण्याची गरज आहे. आम्हाला आत्महत्येचा विचार करायचा नाही. ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सुंदर आत्म्यांना श्रद्धांजली. आपल्या पात्रतेसाठी लढण्याची शक्ती मिळो अशी माझी इच्छा आहे”.

Tags: ajinkya rautmarathi actorTushar Ghadigaonkar suicide
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Next Post
Alka kubal talk about her accident

अपघात, सहा महिने जागेवर, ११० किलो वजन, निर्मात्यांची पाठ अन्...; अलका कुबल यांनी सांगितला वाईट काळ, मोठी सर्जरी आणि...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.