सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एखादा कुटुंबीय विचित्र नाचला, त्याला चिडवलंत आता…”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अवधुत गुप्तेची भूमिका, म्हणाला, “कबरीवरच्या बुरशीला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 25, 2025 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Avadhoot Gupte On Santosh Juvekar

संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अवधुत गुप्तेची भूमिका

Avadhoot Gupte On Santosh Juvekar : ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला असला तरी आजही या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत नाव कमावलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांसह अनेक मराठमोळ्या कलाकारांचाही समावेश पाहायला मिळाला. या चित्रपटातील रायाजींची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकर सध्या त्याने केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना हा संतोषला करावा लागत आहे. मुलाखतींदरम्यान संतोषने केलेले वक्तव्य नेटकऱ्यांना खटकले असून त्यांनी संतोषला चांगलेच ट्रोल केले आहे.

“‘छावा’ सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी मी सेटवर बोललो नाही”, “चित्रीकरणादरम्यान माझ्याशिवाय विकीला करमतही नव्हतं”, ही संतोषची वक्तव्ये आता अनेकांना खटकली असल्याचं दिसलं. आणि नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं. अनेकांनी संतोष जुवेकरचे जुने व्हिडीओ, त्याने यापूर्वी केलेल्या भूमिका शोधून काढत त्याचे मिम्स बनवले आणि त्याला ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकवलं. दरम्यान, संतोषच्या ट्रोलिंगवर अनेक मराठी कलाकारांनी त्याची बाजू सांभाळून घेत भाष्य केलेलं पाहायला मिळालं आहे. यादरम्यान गायक अवधूत गुप्ते यानेदेखील संतोष जुवेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. आणि नेटकऱ्यांना त्याची बाजू समजून घेण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा – अथिया शेट्टी व केएल राहुल झाले आई-बाबा, नातीच्या येण्याने सुनील शेट्टींचाही आनंद गगनात मावेना, चिमुकलीची नजर काढली अन्…

संतोष जुवेकरसाठी अवधूत गुप्तेची खास पोस्ट

मित्रांनो. सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर याचे ‘छावा‘ या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आता गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करत आहात त्याबद्दल थोडसं. अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे. ‘झेंडा’च्या वेळेस ‘संत्या’च्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणादरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘च्या वेळेस देखील तसंच.

‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांचे निरीक्षण करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या बरोबरच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची पद्धत असेल तर ती आपण सर्वांनी स्वीकार करायलाच हवी. कारण याचा रिझल्ट आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे.

अभिनयाच्या याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे. त्याचं घर कधीही जाऊन बघा. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं. त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करुन ठेवल्याची तक्रार आजवर कधीही ऐकलेली नाही.

अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर…

त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे? ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्षभर मेहनत करुन एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की “बाकी… नवीन काय करतोयस?” त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार? त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरंच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, दाखवली लेकाची झलक, नावही ठेवलं एकदम खास

संतोषनेदेखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करुन तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका. कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच!

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल संतोषने यापूर्वी आपली प्रतिक्रिया दिली होती. “मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलं. अक्षय खन्ना मोठा अभिनेता आहे पण, आम्ही स्ट्रगलर्स आहोत त्यामुळे आम्ही मुलाखती देतो. त्या चित्रपटाचा भाग असणं ही खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही”, असं म्हणत त्याने त्याची बाजू मांडली.

Tags: Avadhoot Gupte On Santosh Juvekarsantosh juvekarSantosh Juvekar Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
कुणाल कामराच्या एका गाण्याने राडा, माफी मागायलाही नकार,

कुणाल कामराच्या एका गाण्याने राडा, माफी मागायलाही नकार, एकनाथ शिंदे म्हणाले, “सुपारी घेऊन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.