मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे हे लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये गणले जात असून मालिका, नाटक व सिनेमा अश्या तीनही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. अतुल यांनी बऱ्याच सिनेमा व नाटकांमध्ये विविधांगी भूमिका केल्या असून त्यांच्या रंगभूमीवरील वावर प्रेक्षकांना सुखावून जातो. (atul parchure)
एकीकडे त्यांचे करिअर जोमाने सुरु असताना त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांनी या रोगाशी भयंकर लढा दिला व ते या रोगापासून मुक्त झाले. अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी दिलेला लढा नुकतंच सर्वांसमोर शेअर केला असून ज्येष्ठ पत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्रम्हणे’ पॉडकास्टमध्ये अतुल यांनी कॅन्सरशी दिलेला लढा आणि त्यादरम्यान आलेला अनुभव सांगितलं. (atul parchure fight against cancer)
वाचा अतुल परचुरे यांचा कॅन्सरमुक्त होण्याचा प्रवास (atul parchure fight against cancer)

सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे यांनी सांगितलं की, “मी कॅन्सरविषयी बरंच काही वाचलं होतं. २०२० मध्ये आमच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाले, पण त्यावेळी कोरोना असल्याने आम्ही २०२२ ला ऑस्ट्रेलियाला लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो. तिथे मी अगदी ठणठणीत होतो, पण काही दिवसांनंतर मला काहीच खावंसं वाटत नसल्याचं जाणवला. माझा चुलतभाऊ तिथे असल्याने प्रवासामुळे झाले असल्याचे सांगत मला गोळ्यावगैरे दिल्या. पण न्यूझीलंडला गेल्यानंतर तिथे कावीळ असल्याचं त्यांना संशय आला.”
“भारतात आल्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो असता त्यांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला होता. माझी सोनोग्राफी करताना डॉक्टरांचे हावभाव बदलल्याचे मला समजले. त्यामुळे काहीतरी गंभीर आजार झाल्याचा अंदाज आला होता. नंतर मी हे रिपोर्ट्स दुसऱ्या डॉक्टरांना दाखवले असता, माझ्या लिव्हरमध्ये ट्युमर झाल्याचं सांगितलं. जेव्हा ही गोष्ट माझी आई व बायकोला सांगितलं, तेव्हा त्यांनी मला धीर दिला.” (atul parchure health)
“२९ डिसेंबरमध्ये माझी पहिली ट्रीटमेंट झाली. पण त्या ट्रीटमेंटमुळे तब्येत इतकी बिघडली, की ट्युमर राहिला बाजूला अन पॉट फार सुजलं होतं. पुढे मी सेकंड ओपिनियन घेतले आणि दोन-तीन डॉक्टरांचे सल्ले घेऊन पुढचा उपचार घेतला आणि मी कॅन्सरमुक्त झालो”, असं अतुल यांनी मुलाखतीत सांगितलं. (atul parchure fight against cancer)
अतुल परचुरे यांनी या सगळ्या प्रवासात माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, माझ्या घरचे व संजय नार्वेकर, विनय येडेकर हे मित्र माझ्या सावलीसारखे उभे राहिले असल्याचे सांगताना म्हणाले, “त्याक्षणी एक गोष्ट मला जाणवली की तुमची कशावर तरी श्रद्धा हवी. मग ती पुस्तकावर असो, देवावर असो, कुणावरही असो पण ती हवी आणि १०० टक्के हवी.”