आजवर अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावलं यामध्ये एक नाव स्वाराजूं घेतलं जाईल ते म्हणजे अभिनेते सचिन पिळगांवकर. गायन, नृत्य, अभिनय या प्रत्येक क्षेत्रात आपल्यातल्या कौशल्याची हुबी त्यांनी मांडली. अभिनय क्षेत्रात वावरत असताना त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी तर गाजवलीच मात्र त्यांनी बॉलिवूड मध्येही आपल्या नावाचा डंका वाजवला. बॉलिवूडमधील एका सुपर डुपर हिट चित्रपटात सचिन यांनी वर्णी लावली. (Sachin Pilgaonkar Sholay)
बॉलिवूडच्या इतिहासात क्रांती घडवण्यात एका चित्रपटाचा मोलाचा वाटा आहे तो चित्रपट म्हणजे शोले. सर्वसामान्यांपासून कलाकार मंडळींपर्यंत या चित्रपटाचे फॅन आहेत आणि आजही हा चित्रपट तितक्याच उत्साहाने पाहिला जातो. जय, वीरू, बसंती, ठाकूर ही चित्रपटातली पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली सोबतच आणखी एका मराठमोळ्या कलाकाराने तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकली. तो कलाकार म्हणजे मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर. शोले चित्रपटातील सचिन यांची भूमिका आजवर कुणीही विसरू शकलेलं नाही आहे, मात्र या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठीचा एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे, चला तर पाहूया नेमका काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा मानधनाऐवजी काय मिळाली भेटवस्तू (Sachin Pilgaonkar Sholay)
‘शोले’ चित्रपटातील इमाम चाचा यांचा मुलगा अहमद याची भूमिका सचिन यांनी केली होती. नोकरीसाठी बाहेर जात असताना गब्बरचे डाकू अहमदला पकडतात आणि गब्बरच्या स्वाधीन करतात. त्यानंतर गब्बर त्याला ठार मारून त्याचा मृहदेह घोड्यावर टाकून गावात पाठवून देतो. या सीनसाठी सचिन यांनी तब्बल १९ दिवसांचं शूटिंग केलं होतं.
मात्र वयोमर्यादा कमी असल्याने त्यांचे संपूर्ण सीन या चित्रपटात दाखवण्यात आले नाहीत. वयाच्या सतराव्या वर्षी शूट केल्याने प्रेक्षक ते सीन पाहून कसे प्रतिक्रिया देतील याबद्दल दिग्दर्शकाला शंका असल्याने ते सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आले. दरम्यान या चित्रपटासाठी सचिन पिळगांवकर यांना कोणतेही पैसे देण्यात आले नव्हते. त्या उलट त्यांना एक वस्तू भेट म्हणून देण्यात आली होती.
हे देखील वाचा – यामुळे सलमान खानने धरला होता लक्ष्मीकांत बेर्डेसोबत अबोला
या चित्रपटासाठी सचिन यांना एक फ्रिज भेट म्हणून देण्यात आला होता. याबद्दल सचिन यांनी अनेकदा अभिमानाने सांगितलं आहे की, ही भेटवस्तू त्यांच्यासाठी एखाद्या मानधनाहून मोठी होती.