शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

साताजन्माची साथ अपूर्णच! अतुल परचुरेंच्या आजारपणात पत्नी सोनिया यांनी दिला होती खंबीर साथ, स्वत:च सांगितलेली संपूर्ण परिस्थिती

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 15, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Atul parchure death at the age of 57 wife Sonia supported to actor in his tough time

अतुल परचुरे यांच्या आजारपणात पत्नी सोनिया परचुरे यांनी दिला होता खंबीर लढा

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं.  ते ५७ वर्षांचे होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये कॅन्सरचे निदान झाल्यानंतर, काही काळ ते मनोरंजन विश्वापासून दुरावले होते. मात्र त्यानंतर अतुल यांनी जोरदार पुनरागमन केले. त्या कठीण काळादरम्यान सिनेविश्वातील आणि राजकीय वर्तुळातील अनेकांनी वेळोवेळी साथ दिल्याचे अतुल यांनी विविध मुलाखतींमधून सांगितले होते. या काळात अतुल यांना त्यांच्या पत्नीचीही खंबीर साथ मिळाली. याबद्दलदेखील अतुल यांनी आपल्या भावना वेळोवेळी व्यक्त केल्या आहेत. (Atul Parchure Death)

कॅन्सरसारख्या आजारपणातू बाहेर येत अतुल यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्रम्हणे या यट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी अतुल यांनी आपल्या आजारपणात पत्नी, आई व मुलगी यांची खंबीर साथ लाभले असल्याचे सांगितले होते. याबद्दल अतुल यांनी असं म्हटलं होतं की, “सोनिया माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभी होती हे मला माहीत नव्हतं. कारण तिला चारही बाजूंनी लढा द्यायचा होता. मला, माझ्या आईला आणि माझ्या तब्येतीबाबतचं विचारण्यासाठी डॉक्टरांना तिला सामोरे जावे लागत होते. माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या वाईट बातम्या पहिल्या तिलाच समजत होत्या. त्या पवचवून तिला स्वत:चं कामही करायचं होतं. तिने माझ्या आजारपणात काम नव्हतं केलं. तेव्हा मीच तिला सांगितलं की तू तुझं काम कर नाहीतर तुला वेड लागेल. यावर ती मला म्हणाली होती की, तू बोलत आहेस काम कर, पण माझं मन तरी लगायला हवं ना…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

यापुढे अतुल यांनी असं म्हटलं होतं की, “ती माझ्या पाठीमागे ज्यापद्धतीने उभी होती, त्याला तोड नाही. माझ्या आजारपणात घरी कधीच निराशेचे वातावरण नव्हतं. माझी आई सुरुवातीपासूनच अगदी सकारात्मक आहे. माझी आई, मुलगी आणि माझी बायको या माझ्या आयुषयातील ताकद आहेत. या सासू-सूनांचे इतकं पटतं की विचारायला नको. मी कधीच सासू-सूनांना भांडताना पाहिलं नाही. आम्ही कधी बाहेरून आलो तर सोनियाला आईबरोबर जेवण एकत्र करायचं असतं, ती मला म्हणते तू जा मी आणि आई गप्पा मारत जेवू. आम्हाला बघतच आमची मुलगीही मोठी झाली आहे, त्यामुळे त्या तिघींचे एक वेगळंच आयुष्य आहे. माझी बायको सोनिया आणि माझी आई या दोघी प्रचंड सकारात्मक आहेत”.

दरम्यान, अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज १५ ऑक्टोबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अतुल परचुरे यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. अतुल यांच्या अंतिम दर्शनावेळी निवेदिता सराफ, सुनील बर्वे, आदेश बांदेकर, संजय मोने, सविता मालपेकर, वंदना गुप्ते, दिशा दांडे, सुप्रिया पाठारे, रोहिणी हट्टंगडी या कलाकारांना अश्रू अनावर झाले.

Tags: atul parchure deathAtul Parchure WifeSonia Parchure
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
 Actor Atul Parchure Died

Atul Parchure Death : "आमचा प्रोजेक्ट अपूर्णच राहिला आणि…", अतुल परचुरेंबाबत बोलताना महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, "अचानक असं झालं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.