आई कुठे काय करते मालिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. मालिकेबरोबरच अश्विनी चित्रपटातूनही अधूनमधून भेटीस येत असते. दरम्यान अश्विनी तिच्या पारंपारिक वेशातील फोटोशूटमुळे विशेष चर्चेत असते. अश्विनीला गावाकडची ओढ आहेच हे तिच्या फोटोज वरून कळते. अश्विनी गावाकडचे खासकरून त्यांच्या शेतात काम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहतेही अश्विनीच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा वर्षाव करत असतात.(ashvini mahangade)
पहा अश्विनी काय करतेय (ashvini mahangade)
अशातच अश्विनीने शेतात काम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्या या व्हिडीओखली कमेंट करत लिहिलंय की, रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी,
पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी. ???? जगाचा पोशिंदा : बळीराजा ????
कोणताच राजकारणी किंवा सिस्टम शेतकर्याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा पावसासारखे शाश्वत सत्य आहे. ????????????⛳️???????? ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे. ????????मी घातलेला शर्ट माझ्या वडीलांचा (नानांचा) आहे.????❣️ नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे उन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे.

अश्विनी ही शेतकरी कुटुंबातुन आली आहे. अश्विनीला मायबाप शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे, तिच्या या व्हिडिओतून हे स्पष्ट दिसतंय. अश्विनीने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत राणू आक्काची भूमिका साकारली होती. अश्विनी मालिकेसोबत गडकिल्लाच्या संवर्धनासाठीही काम करताना दिसते. अश्विनीने शेअर केलेल्या व्हडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तीच कौतुक केलं आहे. (ashvini mahangade)
हे देखील वाचा – ईशा-अनिश पळून करणार लग्न? अरुंधती काय उचलणार पाऊल?
एका युजरने लिहिलं, ‘ताई तू एवढी मोठी अभिनेत्री आहेस तरीही तुला मुळीच गर्व नाही. किती साधेपणाने काम करतेयस. आम्हाला तुझा अभिमान आहे.’ तर आणखी एकाने लिहिलय की, ‘ही असतात शेतकर्ऱ्यांची पोरं/पोरी. कितीही मोठी झाली तरी मातीशी नाळ कायम.’ अश्विनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. आणि तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
