बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिकांपैकी एक गायिका म्हणजे अनुराधा पौडवाल. २०१७ मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी केवळ हिंदीच नाहीतर मराठी, तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली व कन्नड चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजात अनेक भजनंही रेकॉर्ड केली गेली आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या सुप्रसिद्ध ‘अभिमान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सुरुवात केली. त्यांनी जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली. पण यासर्व प्रवासात त्या बऱ्याच धक्क्यांना सामोऱ्या गेल्या आहेत. (Anuradha paudwal life incident)
अनुराधा यांना बॉलिवूडमध्ये त्यांचा पहिला ब्रेक ‘टी – सीरीज’चे संस्थापक गुलशन कुमार यांनी दिला होता. अनुराधा यांना इंडस्ट्रीतील पुढची लता मंगेशकर व्हावी अशी गुलशन यांची इच्छा होती. त्या वेळी प्रत्येक गायकाला ‘टी-सीरिज’मध्ये काम करण्याची इच्छा होती. अनुराधा यांनी काही चार्टबस्टर गाणी गायलावर प्रसिद्धीचं शिखर गाठलं. त्यावेळी गुलशनबरोबरच्या त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्याकाळात प्रत्येक संगितकार व दिग्दर्शकाला अनुराधा पौडवालाबरोबर काम करायचं होतं. तेव्हा अनुराधा यांनी फक्त गुलशन कुमार म्हणजेच टी-सीरीजबरोबर काम करणार असल्याचा निर्णय मीडियासमोर जाहीर केला होता.
गुलशन यांनी अनुराधा यांना त्यांच्या गाण्याच्या कारकिर्दीत साथ दिली आणि त्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. पण १९९७मध्ये मुंबईतील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गुलशन यांची १६ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन यांच्या निदनानंतर अनुराधा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर अनुराधा यांचा विवाह संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी झाला. ज्यांनी आर. डी. बर्मन यांच्याबरोबरही काम केलं होतं. १९९१ मध्ये त्यांचा मृत्यूनंतर अनुराधा यांनी मुलांना म्हणजे आदित्य पौडवाल व कविता पौडवाल यांना एकटीने वाढवलं.
त्यानंतर त्यांचा मुलगा आदित्य पौडवाल याचं किडनी निकामी झाल्यामुळे १२ सप्टेंबर २०२० रोजी अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूनंतर अनुराधा यांचं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. त्या पूर्णपणे तुटून गेल्या होत्या.यानंतर त्यांचं इंटस्ट्रीतील गायिका अलका याज्ञिक यांच्याबरोबर सुद्धा वाद झाला होता. अनुराधा यांनी अलकाला दोन गाणी पुन्हा म्हणायला लावली होती. अनुराधा यांनी माधुरी दीक्षितवर आधारित दोन गाणी गायली होती तेव्हा अलका त्यांच्यावर रागावल्या होत्या. या कारणांमुळे अलका यांनी पुढिल दोन वर्षे काम केलं नव्हतं.