चिन्मय मांडलेकर लिखित–दिग्दर्शित ‘गालिब’ हे मराठी नाटक काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात ‘माझा होशील ना’ मालिकेतील लोकप्रिय जोडी सई व आदित्य म्हणजेच गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून हे नाटक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. केवळ प्रेक्षकचं नाही तर अनेक कलाकाररांनादेखील या नाटकाची भुरळ पडली आहे. आजवर अनेक मोठ्या कलाकारांनी या नाटकाचे कौतुक केले आहे.
अशातच आता यात बॉलिवूडच्या एका मराठमोळ्या दिग्दर्शकाचीही भर पडली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी नुकताच या नाटकाचा आस्वाद घेतला असून त्यांनाही नाटक विशेष आवडलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘गालिब’ हे नाटक पाहून आशुतोश गोवारीकर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांच्या ही कौतुकास्पद पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
आशुतोष यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “नुकताच ‘गालिब’ या नाटकाचा ५० वा प्रयोग पाहिला. चिन्मय मांडलेकरने लिहिलेले व दिग्दर्शित केलेले हे नाटक जीवन, साहित्य आणि आणि बाप-मुलीचे अप्रतिम नात्यावर भाष्य करते. चिन्मयने साहित्यविश्वाची आणि लेखकांच्या एकाकी विश्वाची केलेली ही फार मोठी सेवा आहे. “
यापुढे आशुतोष यांनी कलाकारांचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी, अश्विनी जोशी व गुरुराज अवधणी यांनी फार छान काम केले आहे. प्रदिप मुळ्ये यांचे सेट आणि लाईट डिझाईन अतिशय विचारपूर्वक आणि तयार केले आहे. तर राहुल रानडे यांचे संगीतही अगदी कमालीचे आहे”.

आणखी वाचा – मधुचंद्र काश्मीरला करायचा होता पण मग त्याआधीच…; ‘हसताय ना?, हसायलाच पाहिजे’च्या विनोदवीरांचे भन्नाट सादरीकरण
दरम्यान, आशुतोष यांच्या या कौतुकाने गौतमी भारावून गेली आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे असं म्हटलं आहे की, “आजच्या दिवसांत माझ्याबरोबर झालेली सर्वात चांगली बातमी म्हणजे ही. ज्यांचे सिनेमे पाहून मोठे झालो त्यांनी आपलं नाटक पाहणं आणि त्याबद्दल पोस्ट करणे यापेक्षा अजून काय हवं? धन्यवाद आशुतोष गोवारीकर. हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे.”