आपल्या आयुष्यात एकतरी मित्र असा असतो जो नेहमीच आपल्या पाठीशी उभा असतो मग प्रस्थती कोणतीही असो. कधी सुखात कधी दुःखात आपल्या सोबत असलेला मित्र आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला मदत करत असतो.कधी तुमच्या कडून उधार घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे चिडतो त कधी परत दिल्यामुळेही चिडतो. अशीच एक गोष्ट घडलेली मराठी चित्रपट सुर्ष्टीतील दोन मित्रांसोबत ते दोन चांगले मित्र म्हणजे अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते अशोक सराफ.(Ashok Saraf Share Memories)
अशोक सराफ यांनी त्यांच्या बहुरुपी या पुस्तकात हा किस्सा सांगितलं आहे. तर किस्सा आहे अभिनेते नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांच्यात झालेल्या व्यवहाराचा. नाना पाटेकर त्यांचा आवडता सण म्हणजे गणेशउत्सव. एकदा गणपतीसाठी नाना प्रत्येक यांच्याकडे पैशांची थोडी कमतरता होती तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या मित्राला हाक दिली आणि त्यांचा लाडका मित्र म्हणजे अशोक सराफ त्यांच्या मदतीला उभा राहिला नानांनी अशोक सराफ याना ३००० हजार रुपयांची गरज असल्याचे सांगितले आणि अशोक सराफ यांनी चेकबुक देत तुला हवी तेवढी किंमत त्यात लिही असे सांगितले.

हे देखील वाचा – ‘आणि जेव्हा चाहते कलाकाराला लिफ्ट देतात’ कोल्हापूरकरांचा फॅन झाला अभिनेता उत्कर्ष शिंदे
नानांनी मात्र गरजेएवढी ३००० रुपये एवढी किंमत त्यावर लिहिली आणि गणेशउत्सव साजरा केलं यापुढे अशोक सराफ यांनी सांगितले कि काही दिवसांनी नाना पाटेकर यांनी ती रक्कम अशो सराफ याना परत केली त्यावेळी अशोक सराफदुखावलेल्या आवाजात नाना पाटेकर यांना म्हणाले ‘काय नान्या श्रीमंत झालास का? राहूदे ते पैसे तेव्हा नाना पाटेकर यांनी दिलेलं उत्तर प्रत्येकाला शिकण्यासारखं आहे असं अशोक सराफ म्हणाले. पैसे देऊन नाना पाटेकर म्हणाले ‘ नाही रे ,मला देखील पैसे परत देण्याची सवय लागू दे कि..’ नाना पाटेकर यांचं उत्तर मी कधीही विसरणार नाही असं देखील पुढे अशोक सराफ म्हणाले.(Ashok Saraf Share Memories)

नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांनी सावित्री आणि नागीण हे दोन चित्रपट केले शिवाय नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांनी हमीदाबाईची कोठी या प्रसिद्ध नाटकात देखील एकत्र काम केले आहे.