अभिनेता गश्मीर महाजनी याने मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. त्याने साकारलेल्या अनेक भूमिकांना चाहत्यांची पसंती लाभली आहे. गश्मीर अभिनयासह त्याच्या हँडसम लूकिंगसाठी देखील ओळखला जातो. पण काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (gashmeer mahajani)
गश्मीरचे वडील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मात्र दोन दिवसानंतर जेव्हा ही निधनाची बातमी कळली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. शिवाय सोशल मीडियावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर गश्मीरला जोरदार ट्रोल करण्यात आलं, त्यानंतर त्याने काही काळ ब्रेक घेतला होता. आता गश्मीर सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झालं असून त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मनमोकळेपणे दिली आहे.
महाराजांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाला गश्मीर महाजनी… (gashmeer mahajani ask me section)
अभिनेता गश्मीर महाजनीने चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर ‘Ask me Anything’ सेशन ठेवले होते, ज्यात त्याने ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देण्यासह चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली आहे. एका चाहत्याने गश्मीरला “सर तुम्हाला परत छत्रपतींच्या भूमिकेत पाहायला भेटेल का ?” असा प्रश्न विचारला असता, त्याने यावर उत्तर देताना म्हटलंय, “थांबा जरा.. बाकी सगळ्यांना करुद्यात.. . हिंदी, मराठी, तामील, तेलगु … त्यांचं करुन झालं कि मग आपण करु.” (gashmeer mahajani ask me section)
अभिनेता गश्मीर महाजनी याने आतापर्यंत ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’, ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ अश्या अनेक मराठी चित्रपट व हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे. शिवाय तो ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याच्या ही भूमिका चाहत्यांना विशेष आवडली असून गश्मीरला पुन्हा एकदा या भूमिकेत पाहण्यासाठी आतुरलेले आहे. (gashmeer mahajani ask me section)
हे देखील वाचा : “तुम्हाला याबद्दल जाणून घेण्याची काही गरज नाही..” वडिलांच्या निधनावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोलरवर भडकला गश्मीर महाजनी