जन्मतः मुलाला आईच्या मायेची उब जरा जास्तच मिळते. आई आणि मुलाचं नातं जस जगात निराळं, खास मानलं जात तसेच बाप आणि मुलाचं नातं ही काहीस जास्तच मायेचं असत. क्षणोक्षणी मुलाच्या बाजूने उभी राहणारी आई घरोघरी पाहायला मिळते. अगदी लहापणी केलेल्या खोडकर चुकांपासुन ते मोठेपणाचा झालेल्या काही चुकांपर्यंत सगळ्यांपासून सावरणारी फक्त आई असते. वडील हे पात्र इतिहासाने बऱ्याचदा कठोर दर्शवलं पण काही वेळा हे अपवाद ठरत. असच एक नातं आपल्या मनोरंजनविश्वात आहे ते म्हणजे अभिनेता अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि त्यांचा मुलगा अनिकेत. अशोक मामांच्या जीवनचरित्रात या बद्दलचा एक किस्सा निवेदिता ताईंनी शेअर केला आहे. (nivedita saraf and ashok saraf)
पहा असं काय झालं होत अनिकेत आणि अशोक सराफ यांच्यात (nivedita saraf and ashok saraf)
अशोक सराफ आणि त्यांच्या वडिलांबद्दल बोलताना निवेदिता म्हणाल्या, मी या घरात येण्याआधी अशोकची आई गेली, पण त्याच्या बाबांबरोबरचं नातं मी बघितलंय. दौऱ्यावरून आला की कितीही दमला असला तरी तो बाबांबरोबर थोडा का होईना वेळ घालवायचाच. त्यांची नखं कापून देणं, दाढी करणं हे सगळं तो जातीनं करायचा. ते करताना त्याला बरं वाटतंय हे मला जाणवायचं. अशोक त्याच्या बाबांशी खूप अटॅच्ड होता.
यापुढे निवेदितांनी अनिकेत आणि अशोक सराफ यांच्या नात्याबद्दल भाष्य करत लिहिलंय, अनिकेत अगदी लहान होता तेव्हा तोही त्याच्या पपांशी अटॅच्ड होता. अशोक त्या काळात खूप बिझी असायचा. त्यातूनही वेळ काढून त्यानं अनिकेतला सायकल चालवायला शिकवलं. अनिकेतबरोबर वेळ घालवता यावा यासाठी तो आवर्जून प्रयत्न करायचा. काही वेळा ते दोघंही आइसक्रीम खायला बाहेर जात.(nivedita saraf and ashok saraf)

====
हे देखील वाचा – मीनाक्षीच्या लेकीला ‘वेड’ची भुरळ
====
मात्र अनिकेत मोठा व्हायला लागला तसतशी त्यांच्यात एक दरी निर्माण झाली. इतकी की मला मध्यस्थाची भूमिका निभावावी लागायची. अनिकेतविषयी काही बोलायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल तर अशोक माझ्याशी बोलायचा आणि अनिकेतला पपांबद्दल बोलायचं असेल तर तोही माझ्याकडे यायचा. ती दोघं एकमेकांबरोबर संवादच साधू शकत नव्हते. मोकळेपणानं बोलणं तर दूरच. दोघांच्या वयामध्ये असलेलं अंतर त्यासाठी कारणीभूत असावं. त्यांचे स्वभावही एकमेकांच्या अगदी विरुद्ध, त्यातूनही हे फ्रिक्शन निर्माण झालं असावं.
अनिकेत आणखी थोडा मोठा झाला आणि ही दरी हळूहळू बुजली. मात्र याचं श्रेय मी अनिकेतला जास्त देईन. एक दिवस तो अशोकच्या जवळ जाऊन बसला. दोघं गप्पा मारू लागले. बाप मुलाच्या नात्यात अचानक निर्माण झालेली ही दरी निवेदिता यांनी त्यांच्या कलेनेचं त्यांना बुझवायाला दिली. एक आई म्हणून वा एक पत्नी म्हणून निवेदिता यांनी मांडलेली बाजू अगदी योग्य होती यांत शंकाच नाही.
