बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला त्या दिग्गज मंडळींमध्ये…”, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ भावुक, म्हणाले, “नकळत जबाबदारी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 31, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ashok Saraf Emotional

"मला त्या दिग्गज मंडळींमध्ये…", 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर होताच अशोक सराफ भावुक, म्हणाले, "नकळत जबाबदारी…"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार २०२३ हा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देत गौरविले आहे. अशोक सराफ यांच्या मनोरंजन सृष्टीतील भरीव योगदानासाठी यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देत त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावरून सर्वच स्तरातून अशोक सराफ यांचं कौतुक होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. अशातच हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर नेमकी कशी भावना आहे याबाबत इट्स मज्जासह बोलताना अशोक सराफ भावुक झालेले पाहायला मिळाले. (Ashok Saraf Emotional)

अशोक सराफ प्रतिक्रिया देत म्हणाले, “आपण जे करायचं ठरवलं होतं त्यात आपण कुठेतरी यशस्वी होत जातो हे जाणवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मला हा पुरस्कार मिळेल असं वाटलं नव्हतं, पण मी केलेलं हे कुठेतरी लोकांच्या मनात रुजू होत होतं. आणि ही सेवा आज सरकार दरबारी रुजू झाली आहे हे मला जास्त महत्त्वाचं वाटत आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला फोन आला. त्यानंतर मग सुधीरराव मुनगंटीवार यांचा फोन आला. दोघांचाही मी आभारी आहे. त्यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले. निवड समिती मार्फत माझा या पुरस्कारासाठी विचार केला, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. कलाकार नेहमीच काम करत असतो. ते कितपत यशस्वी होतंय, कोणाला आवडतंय याचे नुसते ठोकताळे बांधत असतो. पण असा एखादा सत्कार करून तुम्ही आम्हाला आमच्या कामाची जाणीव करुन देता, आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देता”.

आणखी वाचा – गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, “त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर…”

पुढे अशोक सराफ म्हणाले, “हा पुरस्कार मिळाल्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यावी हेच मला कळत नव्हतं. मी महाराष्ट्राचा आहे, ही माझी कर्मभूमी, जन्मभूमी आहे त्या महाराष्ट्राचा हा नंबर वनचा पुरस्कार मी मानतो. हा पुरस्कार मला मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत हा पुरस्कार ज्या लोकांना मिळाला आहे ती दिग्गज मंडळी आहेत. आणि त्या दिग्गज मंडळींमध्ये मला आज नेऊन बसवलं आहे हे माझ्या दृष्टीने कायम लक्षात राहणारी गोष्ट आहे. आनंद होणं साहाजिक आहे, पण हा वेगळाच आनंद देणारा क्षण आहे”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्र भूषण’ अन् सराफ कुटुंबात आनंद; आईवडिलांसह स्वामी समर्थांचेही घेतले आशीर्वाद, मामांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

रसिकांच्या प्रेमाबाबत बोलताना ते म्हणाले, “जेव्हा असं कौतुक होतं, जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा रसिकांसाठी आणखी काही करण्याची जबाबदारी नकळत वाढते. दरवेळेला ही जबाबदारी वाढते हे तुम्ही कसं मान्य करता तेही महत्त्वाचं आहे. मला नेहमीच असं वाटतं की, आपल्यावर प्रेक्षक एवढं प्रेम करतात तर आपण त्यांच्यासाठी नेहमीच काहीतरी खास करायला हवं. जबाबदरी आपणच वाढवून घेणं हे कलाकाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्याचा सत्कार करता, पुरस्कार देता तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी वाढवत असता. आणि ही माझी जबाबदारी वाढली आहे असं मी मानतो. मी सर्व महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना व महाराष्ट्रातील अमराठी प्रेक्षकांना अभिवादन करतो की, माझं केलेलं कौतुक, व मला दिलेला पुरस्कार त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे” असं म्हणत त्यांनी आभार व्यक्त केले.

Tags: ashok sarafashok saraf awardashok saraf maharashtra bhushan purskarentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
Actress mrunmayee Deshpande shared funny video with wishing gautami on her birthday

Video : वाढदिवशीही गौतमीला बहिणीकडून त्रास, मृण्मयीच्या शुभेच्छांनी अभिनेत्रीला आला राग, म्हणाली, “मला न्याय हवाय!”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.