शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आशिष पाटीलचे सूप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “त्यांना भेटलो तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 28, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashish Patil expressed his happiness to work with Bollywood director Sanjay Leela Bhansali.

आशिष पाटीलचे सूप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण, पोस्ट शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाला, “त्यांना भेटलो तेव्हा...”

प्रत्येक कलाकार हा त्याच्या आयुष्यातील कोणत्या न कोणत्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतो, अपार मेहनत करून तो ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि या काळात त्याला अनेक संघर्ष व आव्हांनाना सामोरे जावे लागते. मात्र स्वप्नपूर्ती होताच त्याच्या संघर्षापुढे आभाळही ठेंगणे होते. अशीच एक स्वप्नपूर्ती झालेला कलाकार म्हणजे लावणीकिंग आशिष पाटील. अनेक हिंदी व मराठी डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये नृत्यदिग्दर्शक म्हणून झळकलेला लोकप्रिय नृत्यकलाकार म्हणून आशिष पाटील हे नाव सर्वश्रुत आहे.

आजवर मराठीसह अनेक हिंदी रिअ‍ॅलिटी शोजमध्ये झळकलेला आशिष पाटील आता नुकताच बॉलिवूडच्या एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबरही झळकला आहे आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे संजय लीला भन्साली. मराठमोळ्या आशिषने आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडपर्यंत मजल मारल्याने त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. याबद्दल स्वत: आशिषने एक खास पोस्टही लिहिली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Ashish Patil (@ashishpatil_the_lavniking)

आशिषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संजय लीला भन्सालीबरोबरचा एक फोटो शेअर करत त्याखाली असं म्हटलं आहे की, “कोण म्हणतं स्वप्नं खरी होत नाहीत. माझे नुकतेच खरे झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न मी नेहमीच पाहिले होते आणि गेल्या वर्षी त्यांना भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ते स्वप्न प्रत्यक्षात आले. त्या क्षणी माझ्या हृदयात आणि मनात काय चालले होते ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी त्यांना भेटलो तेव्हा खूप भारावून गेलो होतो. ते (संजय लीला भन्साली) खूप नम्र व मितभाषी होते; पण मी उत्साहाने व आनंदाने थरथरत होतो.”

आणखी वाचा – पारुला मृत्यूच्या दारातून परतण्यासाठी Bombay blood groupची गरज, नव्या ब्लड ग्रुपबाबत विचारत प्रेक्षक बुचकाळ्यात, नक्की हा प्रकार काय?

यापुढे आशिषने असं म्हटलं आहे की, “संजय लीला भन्साली यांनी त्यांच्या ‘हीरामंडी’मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी मला दिलेल्या आयुष्यभराच्या या अद्भुत संधीबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानू तेवढे कमी आहेत. सर, तुम्ही परिपूर्णता आणि नम्रतेचे प्रतीक आहात; आणि तुमच्याबरोबर काम करून तुमचे मार्गदर्शन आणि कौशल्य मला मिळाले हा माझ्यासाठी मला खरोखरच एक आशीर्वाद आहे. तुम्हांला मनापासून प्रेम आणि आदर”

आणखी वाचा – Video : लेकीच्या बर्थडे पार्टीमध्ये सचिन पिळगांवकरांचा बायकोसह रोमँटिक डान्स, श्रियाही बेभान होऊन नाचली अन्…; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आशिषच्या या पोस्टखाली अनेक कलाकार मंडळींनी व अनेक चाहत्यांनी लाईक्स् व कमेंट्स करत त्याच्या या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी त्याला अनेकांनी शुभेच्छा व त्याचे कौतुकदेखील केले आहे.

Tags: Ashish PatilBollywood entertainment newsmarathi entertainment newsSanjay leela bhansali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Vishal Thakkar also went missing 9 years ago like Gurucharan Singh in Taarak Mehta Ka Ooltah Chashma

गुरुचरण सिंहप्रमाणेच ‘तारक मेहता...’मधील ‘हा’ अभिनेताही झाला होता गायब, ९ वर्षे झाले तरी सापडला नाही, कुटुंबीय अजूनही बघत आहेत वाट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.