‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आणि यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात यशस्वी आहेत. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आणि त्या भूमिका अजरामर केल्या. ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर प्रेक्षकांना हसवणारे सिद्धार्थ हे अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ८ मार्च २००४ साली सिद्धार्थ यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या अकाली निधनाने त्यांची पत्नी शांतीप्रिया यांना मोठा धक्का बसला आणि या नंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. मात्र आता शांतीप्रिया कुठे आहे आणि ती काय करत आहे? माहीत आहे का? चला जाणून घेऊया… (Siddharth Ray Wife Shantipriya Struggle)
अभिनेत्री शांतीप्रियाने ९० च्या दशकाच्या सुरुवातीला सुपरस्टार अक्षय कुमारबरोबर सिनेक्षेत्रात पदार्पण केले. पदार्पणातच ती प्रसिद्धी झोतात आली. शांतीप्रियाने १९९१ मध्ये अक्षय कुमारबरोबरच्या ‘सौगंध’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. अक्षयचाही हा पहिलाच पदार्पणाचा चित्रपट होता. पदार्पणाच्या वेळी शांतीप्रिया अवघ्या २२ वर्षांची होती. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी तमिळ, तेलुगू व कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण तिला तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींसारखे यश मात्र मिळू शकले नाही. नंतर अभिनेत्रीने सिद्धार्थ रेशी लग्न केले. मात्र सिद्धार्थच्या अकाली निधनाने शांतीप्रिया यांना मोठा धक्का बसला आणि त्या सिनेक्षेत्रातून काहीशा लांब गेल्या.
२२ सप्टेंबर १९६९ रोजी जन्मलेल्या शांतीप्रियाचे वयाच्या ३० व्या वर्षी १९९९ मध्ये सिद्धार्थ रेशी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर पाच वर्षांनी २००४ मध्ये सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्या वेळी शांतीप्रिया फक्त ३५ वर्षांची होती. शांतीप्रियाने सिद्धार्थ रेशी लग्न केले. शाहरुख खानच्या ‘बाजीगर’ या हिट चित्रपटासाठी सिद्धार्थची आठवण होते. पतीच्या निधनाने ही अभिनेत्री उद्ध्वस्त झाली आणि बॉलिवूडपासूनही काहीशी दूर राहिली.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याच्यावर माझा विश्वासच नाही” अंकिता-अभिजीतमध्ये फुट, कशावरुन झाले मतभेद?
काही काळानंतर ती ‘माता की चौकी’ या मालिकेत दिसली. अभिनेत्रीने २०२२ मध्ये आलेल्या सुनील शेट्टीच्या ‘धारावी बँक’ या वेबसीरिजद्वारे पुनरागमन केले. दरम्यान, शांतीप्रियाने ‘फुल और अंगार’, ‘मेहेरबान’, ‘मेरा सजना साथ निभाना’, ‘वीरता’, ‘अंधा इतंकाम’, ‘हॅमिल्टन पॅलेस’, ‘सौगंध’, ‘इक्के पे इक्का’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावरही सक्रीय असते.