गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अंबानी कुटुंबाचीच चर्चा सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च या दरम्यान अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जगभ्रातून अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच खूप एंजॉय केले. अनेक कलाकरांनी परफॉर्मन्सही सादर केले आहेत. या शाही सोहळ्यासाठी उत्तम सजावट करण्यात आली होती. या सजावटीचे सर्वांनीच कौतुक केले आहे. (Maria goretti on Ambani family pre-wedding function)
जामनगर येथील ‘रीलायन्स ग्रीन्स’ येथे हा सोहळा पार पडला. या ठिकाणीच कलाकारांच्या परफॉर्मन्ससाठी भव्य मंच उभारण्यात आले होते. भव्य-दिव्य रोषणाई,बसण्याची आलिशान सुविधा हे सर्वच डोळ्याचे पारणं फेडणारं होतं. पण अशातच अभिनेता अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टीने या कार्यक्रमाबाबत नाराजी दर्शवली आहे. तिने अनंत व राधिकाच्या आयोजित सोहळ्यामध्ये असलेल्या हत्तीचा एक वस्तु म्हणून वापर केला आहे असं तिचं म्हणण आहे. मारियाने प्राण्यांबद्दल सहाभूती दाखवत तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर इवांका ट्रंपचा हत्तीबरोबर पोज देतानाचा फोटो शेअर केला आहे.

हा फोटो स्टोरीवर पोस्ट करत मारियाने लिहिले आहे की, “मी अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यातील फोटो बघून हैराण झाले आहे. कोणत्याही प्राण्याबरोबर असे होऊ नये. खासकरून त्या प्राण्यांबरोबर ज्यांना वाचवण्याची गरज आहे आणि ज्यांचे पुनर्वसन होऊ शकते अशा प्राण्यांबरोबर तर नाहीच. ही खूप वाईट आहे की एका हत्तीला लोकांमध्ये आणि गोंधळ असलेल्या ठिकाणी एक शोची वस्तू म्हणून उभे केले आहे”. मारियाच्या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच त्यावर माध्यमांमध्ये अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.
राधिका व अनंतच्या या थीम आधारित सोहळ्यामध्ये एक थीम अशी होती जी जंगल आधारित होती. या मध्ये ॲनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’चा देखील समावेश होता. यामध्ये ज्या प्राण्यांचे योग्य पालन-पोषण होत नाही अशा प्राण्यांना इथे आणून त्यांना योग्य सुविधा दिल्या जातात. असे असताना अंबानी यांनी हत्तीचा असा वापर का केला? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.