शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोणत्याही प्राण्याबरोबर…”, अरशद वारसीच्या बायकोने अंबानी कुटुंबियांना चांगलंच सुनावलं, बेधडक वक्तव्य, म्हणाली, “खूप वाईट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 6, 2024 | 2:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maria goretti on Ambani family pre-wedding function

"कोणत्याही प्राण्याबरोबर...", अरशद वारसीच्या बायकोने अंबानी कुटुंबियांना चांगलंच सुनावलं, बेधडक वक्तव्य, म्हणाली, "खूप वाईट..."

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अंबानी कुटुंबाचीच चर्चा सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे १ ते ३ मार्च या दरम्यान अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जगभ्रातून अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांनीच खूप एंजॉय केले. अनेक कलाकरांनी परफॉर्मन्सही सादर केले आहेत. या शाही सोहळ्यासाठी उत्तम सजावट करण्यात आली होती. या सजावटीचे सर्वांनीच कौतुक केले आहे. (Maria goretti on Ambani family pre-wedding function)

जामनगर येथील ‘रीलायन्स ग्रीन्स’ येथे हा सोहळा पार पडला. या ठिकाणीच कलाकारांच्या परफॉर्मन्ससाठी भव्य मंच उभारण्यात आले होते. भव्य-दिव्य रोषणाई,बसण्याची आलिशान सुविधा हे सर्वच डोळ्याचे पारणं फेडणारं होतं. पण अशातच अभिनेता अर्शद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टीने या कार्यक्रमाबाबत नाराजी दर्शवली आहे. तिने अनंत व राधिकाच्या आयोजित सोहळ्यामध्ये असलेल्या हत्तीचा एक वस्तु म्हणून वापर केला आहे असं तिचं म्हणण आहे. मारियाने प्राण्यांबद्दल सहाभूती दाखवत तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर इवांका ट्रंपचा हत्तीबरोबर पोज देतानाचा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : पैठणी साडी, नाकात नथ अन्…; मराठी पुरस्कार सोहळ्याला शिल्पा शेट्टीची मराठमोळ्या अंदाजात रॉयल एन्ट्री, साडीने वेधलं लक्ष

हा फोटो स्टोरीवर पोस्ट करत मारियाने लिहिले आहे की, “मी अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यातील फोटो बघून हैराण झाले आहे. कोणत्याही प्राण्याबरोबर असे होऊ नये. खासकरून त्या प्राण्यांबरोबर ज्यांना वाचवण्याची गरज आहे आणि ज्यांचे पुनर्वसन होऊ शकते अशा प्राण्यांबरोबर तर नाहीच. ही खूप वाईट आहे की एका हत्तीला लोकांमध्ये आणि गोंधळ असलेल्या ठिकाणी एक शोची वस्तू म्हणून उभे केले आहे”. मारियाच्या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. तसेच त्यावर माध्यमांमध्ये अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत.

आणखी वाचा – Video : नीता अंबानींचा लेकीसह स्टेजवर जबरदस्त डान्स, कुटुबियांसह उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

राधिका व अनंतच्या या थीम आधारित सोहळ्यामध्ये एक थीम अशी होती जी जंगल आधारित होती. या मध्ये ॲनिमल रेस्क्यू सेंटर ‘वनतारा’चा देखील समावेश होता. यामध्ये ज्या प्राण्यांचे योग्य पालन-पोषण होत नाही अशा प्राण्यांना इथे आणून त्यांना योग्य सुविधा दिल्या जातात. असे असताना अंबानी यांनी हत्तीचा असा वापर का केला? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.    

Tags: anat ambaniArshad vaarsibollywood actormaria gorettimukesh ambaniradhika merchant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Amruta Bane and Shubhankar Ekbote shared a special video of their Kelvan on social media

Video : मराठीमधील आणखी एका जोडप्याचं ठरलं लग्न, केळवणालाही सुरुवात, अभिनेता आहे सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा लेक, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.