Arrest Warrant Against Sonu Sood : अभिनेता सोनू सूद नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. कोरोनो काळानंतर अभिनेता बराच चर्चेत राहिला आहे. बरेचदा अभिनेता समाजकार्य करताना दिसला. अनेकांना हवी ती मदत करण्यासाठी तो वेळोवेळी धावला. असे असले तरी बर्याच अडचणीत तो अडकलेलाही दिसला. यानंतर आता अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण लुधियाना कोर्टाने त्याच्याविरुद्ध अटक करण्याचे वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट अभिनेत्याविरुद्ध न्यायालयीन दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी जाहीर केले आहे. असे सांगितले जात आहे की, सोनू सूदला कोर्टात साक्ष देण्यासाठी वारंवार समन्स पाठवले गेले होते, परंतु तो एकदाही पोहोचला नाही. या संदर्भात त्याच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
खरं तर, लुधियानाचे वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीविरुद्ध दहा लाख रुपयांच्या फसवणूकीचा खटला दाखल केला. यामध्ये त्यांनो बनावट रिझिका नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले गेले. अॅडव्होकेट राजेश खन्ना यांनी त्याच प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप केला आणि त्याच प्रकरणात साक्ष देण्यासाठी सोनू सूद यांना बोलावण्यात आले. याबाबत समन्स सोनू सूदला बर्याच वेळा पाठविण्यात आले होते, परंतु साक्ष देण्यासाठी तो एकदाही कोर्टात पोहोचला नाही. हे लक्षात घेता, आता सोनूविरूद्ध अटक करण्याचे वॉरंट कोर्टाने काढले आहे.
आणखी वाचा – “प्रेक्षकांचे हे ऋण…”, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफांनी मानले आभार, म्हणाले, “केंद्र सरकार…”
ओशिवारा पोलिस स्टेशन, अंधेरी वेस्टला पाठविलेल्या वॉरंटमध्ये असे निर्देश देण्यात आले आहेत की, सोनू सूदला अटक करुन न्यायालयात अटक केली जावी. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होईल. सध्या या प्रकरणात सोनू सूद किंवा त्याच्या टीमचे कोणतेही विधान नाही. व्यावसायिक आघाडीबद्दल बोलताना सोनू सूद नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘फतेह’ मध्ये दिसला होता.