सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली महागडी कार, लेकाला मिठी मारत भावना अनावर, पूजाही केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मे 20, 2024 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Muramba serial fame Sulekha Talwalkar bought a new car video shared on social media

Video : सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली महागडी कार, लेकाला मिठी मारत भावना अनावर, पूजाही केली अन्...; व्हिडीओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये कधी आई तर कधी सासूच्या भूमिका साकारत अभिनेत्री सुलेखा तळवलकर घराघरांत पोहोचल्या. मराठी नाटक, मालिका व चित्रपटांतून त्यांनी कधी नायिका तर कधी खलनायिका म्हणून त्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या सुरेखा या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात. सध्या सुलेखा तळवलकर त्यांच्या युट्यूब चॅनेलमुळे चर्चेत असतात.

सुलेखा यांच्या ‘दिल कें करीब’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. याशिवाय सुलेखा सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांच्या कामानिमित्त व काही फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सुलेखा यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओद्वारे अभिनेत्रीने गाडी घेतल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sulekha Talwalkar (@sulekhatalwalkar)

सुलेखा यांनी नुकतीच एक नवीन अलिशान कार खरेदी केली असून याचा एक खास व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओखाली सुलेखा यांनी असं लिहिलं आहे की, “गाडी चालवणे ही माझी आवड आहे आणि गाड्या ही माझी कमजोरी आहे. कपड्यांनी भरलेल्या वॉर्डरोबपेक्षा गाड्यांनी भरलेले वॉर्डरोब असणं हे माझं नेहमीच एक वेडं स्वप्न होतं.

आणखी वाचा – “गडकिल्ल्यावर बाई कधीच नाचली नाही”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “जाहीर निषेध कारण…”

यापुढे सुलेखा यांनी “मी माझ्या कुटुंबात आणखी एका नवीन सदस्याचा समावेश केला आहे. मोहक, अनेक वैशिष्ट्ये असलेल्या या कारचे मी माझ्या घरी स्वागत करत आहे. मी तुझी चांगली काळजी घेईन आणि तुला आनंदी ठेवीन” असं म्हटलं आहे. सुलेखा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “७५ पेक्षा जास्त वय असूनही…”, बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, “या वयात…”

दरम्यान, सुलेखा यांनी शेअर केलेल्या या नवीन गाडीच्या व्हिडीओला प्रेक्षकांसह अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी सुलेखा यांना त्यांच्या या नवीन गाडीसाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदनही केले आहे.   

Tags: marathi actressmarathi entertainment newsSulekha Talwalkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
dharmendra and paresh rawal on election

मतदान करायला आल्यानंतर भडकले धर्मेंद्र, परेश रावल यांनीही केलेलं वक्तव्य लोकांना पटेना, म्हणाले, "यांचा कर वाढवा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.