कधी कधी कलाकाराला प्रेक्षक इतका गृहीत धरतो कि कलाकाराला शारीरिक, मानसिक इजा नकळतपणे घडून जाते. असच काहीस झालाय बॉलीवूड मधील लोकप्रिय गायक अरिजित सिंग सोबत. छत्रपती संभाजी नगर येते एका कार्यक्रमा दरम्यान अरिजित तिथे उपस्थित होता. त्यावेळी मराठीतील प्रसिद्ध गायकी असलेलं शिंदेशाही कुटुंबातील गायक, अभिनेता उत्कर्ष देखील तिथे उपस्थित होता. त्याने एक व्हिडिओ शेअर करत अरिजित सोबत घडलेला हा प्रसंग प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.(Arijit Singh gets injured)
तर घडलं असं कि कार्यक्रमाच्या दरम्यान अरिजित फॅन्सना भेटण्यासाठी पुढे गेला त्यावेळी एका चाहत्यांकडून जोरात अरिजितचा हाथ ओढला गेला आणि त्याला वेदना होऊ लागल्या त्यावेळी अरिजित ने फॅन्सना समजावून सांगितले कि ‘ तुम्ही हाथ ओढल्यामुळे मला त्रास होत आहे, मी इथे सगळ्यांना भेटीला आलो आहे. असं काही झालं तर मला गट येणार नाही. अशा अनेक शब्दात अरिजित ने चाहत्यांची समजूत काढली. चाहत्याने ने देखील घडलेल्या प्रकाराबाबत अरिजितची माफी मागितली.

हे देखील वाचा – “मोठी गाडी नाही म्हणून आदिनाथला वाटायची लाज”
म्हणून कडाडली शिंदेशाही…(Arijit Singh gets injured)
या संदर्भात उत्कर्षने पोस्ट करत लिहिले आहे कि (औरंगाबाद) चालू असताना अरिजित सिंगच्या चाह्त्याने हात ओढला. काल मी अरिजित सिंगच्या लाइव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली .हजारो चाहते त्याच्या गाण्याचा आनंद घेत होते. एका महिला फॅनने अरिजित सिंगचा हात खेचला ज्याने तो गिटार वाजवत होता. कारण त्यामुळे त्याला दुखापत झाली, त्या नंतर त्याला ना गिटार वाजवता आला ना तो चाहत्यांशी हस्तांदोलन करू शकला.
चाहत्यांनी समजून घेतले पाहिजे की आम्ही कलाकार तुमच्यावर खूप प्रेम करतो तुमच्या प्रेमामुळे आम्ही जे आहोत ते आम्ही आहोत .पण बरेचदा काहीतरी समजले पाहिजे, काही परिपक्वता काही सन्मान, काही चाहत्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून असे अपघात होणार नाहीत. कधी कधी मद्यधुंद चाहते येतात असेच असभ्य वागतात आणि नसंपणारे असंख्य सेल्फी मागतात, बरेचदा काही चाहते हे विसरतात की कलाकाराला तूमच प्रेम हवे ना की त्रास.