Screen time while eating risks: आजच्या काळात सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेकदा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या रील्स पाहतो. सध्या ही रील्स पाहण्याची सवय आपल्या सर्वांमध्येच इतकी रुजली आहे की लोक जेवतानाही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक असतात, जे अनेकदा जेवताना रील्स किंवा व्हिडीओ बघणं पसंत करतात. पण तुम्हाला माहित आहे का?, तुमच्या या सवयीमुळे तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता. जेवताना रील्स बघणं यामुळे तुमच्या पोटातील चरबी वाढण्याचा धोका संभवू शकतो.
जेवतांना फोनचा वापर करणं किंवा टीव्ही बघणं याचा आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. जेव्हा लक्ष अन्नाऐवजी स्क्रीनवर केंद्रित केले जाते, तेव्हा मेंदूला ‘अन्नातून समाधान मिळण्याऐवजी’ ‘चांगले वाटणे’ असा सिग्नल मिळतो. यामुळे पोटhttps://marathi.itsmajja.com/navri-mile-fame-actor-starts-new-business-from-cloud-kitchen-to-big-hotel-said-by-the-grace-of-swami/ भरल्याचे संकेत देणाऱ्या हार्मोन्सचे प्रकाशन रोखले जाते, म्हणजेच तुम्हाला असमाधान वाटते आणि तुम्ही खात राहता. याव्यतिरिक्त, लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाच्या वासाची आणि चवीची जाणीव कमी होते, ज्यामुळे खाण्याचा आनंद देखील कमी होतो. यामुळे प्रक्रिया केलेले किंवा अस्वास्थ्यकर अन्न खाण्याची इच्छा वाढू शकते, ज्यामुळे चयापचय आणखी मंदावतो. रील पाहिल्याने अनेकदा मसालेदार किंवा अस्वास्थ्यकर जेवण खाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. जेवणादरम्यान जास्त स्क्रीन बघितल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोम सारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. (Screen time while eating risks)
जेव्हा लक्ष विचलित होतं तेव्हा आपण खूप घाई-घाईत लवकर खातो आणि त्यामुळे टाइप २-मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्या उद्भवू शकतात. जेवणादरम्यान स्क्रीन टाइममुळे केवळ लक्ष विचलित होत नाही तर निष्क्रिय जीवनशैली देखील वाढते, जी अनेक आरोग्य समस्यांचे एक प्रमुख कारण आहे. (Screen time while eating risks)




