सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुनिधी चव्हाणच्या कॉन्सर्टमध्ये ‘कमळी’चा जबरदस्त डान्स; स्वतःच्या नावाच्या गाण्यावर नाचली अन् विजयाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 31, 2025 | 11:06 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vijaya Babar Dance Video

'कमळी'चा जबरदस्त डान्स

Vijaya Babar Dance Video : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरली आहे. साधी कथा, ग्रामीण पार्श्वभूमी आणि प्रभावी अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांची विशेष आवडती ठरत आहे. विशेषतः मालिकेतील कमळीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री विजया बाबर हिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे कमळी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. सध्या ‘कमळी’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर असून मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत.

दरम्यान, मालिकेतील साधी, गावाकडची कमळी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अगदी वेगळ्या स्वभावाची आहे, हे नुकतंच समोर आलं आहे. अभिनेत्री विजया बाबरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. विजया ही खऱ्या आयुष्यात अत्यंत मनमोकळी, उत्साही आणि मॉडर्न असल्याचं या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा – कन्नड सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या, अभिनय सोडण्यास कुटुंबाकडून होता दबाव, नेमकं प्रकरण काय?

View this post on Instagram

A post shared by Vijaya Babar (@vijaya_babar)

हा व्हायरल व्हिडीओ सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्हाण हिच्या एका लाईव्ह कॉन्सर्टमधील आहे. या कॉन्सर्टदरम्यान विजया प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. याच वेळी बॉलिवूड चित्रपट ‘धूम ३’ मधील लोकप्रिय गाणं ‘कमली कमली’ वाजताच विजयाने सुंदर डान्स केलं. मालिकेच्या नावाशी जुळणाऱ्या या गाण्यावर ती मनमुराद नाचताना दिसत आहे. तिचा उत्स्फूर्त डान्स, हसरा चेहरा आणि आत्मविश्वास चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लवकरच विवाहबंधनात अडकणार; ‘या’ दिवशी आणि ‘या’ ठिकाणी होणार लग्नसोहळा

या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हे तर तुझंच गाणं आहे”, “ही आमची कमळी आहे”, “कमळी रॉक” अशा अनेक मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्स करत चाहत्यांनी विजयावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. छोट्या पडद्यावर गंभीर आणि साधी भूमिका साकारणारी कमळी प्रत्यक्ष आयुष्यात इतकी एनर्जेटिक आणि ग्लॅमरस आहे, हे पाहून चाहते चकित झाले आहे. एकीकडे मालिकेतून विजया बाबर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. तिचा हा व्हायरल डान्स व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsVijaya Babar Dance Video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Malaika Arora Talks About Her Divorce

"मला कोणताही पश्चाताप नाही…", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटाबद्दल मलायका अरोरा स्पष्टच बोलली; म्हणाली, "घटस्फोट झाल्यानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.