शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिव ठाकरेसोबत अफेअर असल्याच्या चर्चांवर डेझी शाहने सोडलं मौन, म्हणाली, “आमच्यात मैत्रीहून अधिक ..”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 1, 2023 | 1:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Shiv Thakare and Daisy shah Relationship

Shiv Thakare and Daisy shah Relationship

अभिनेता शिव ठाकरे हा बिग बॉस मराठी मुळे चर्चेत आला, मात्र त्यांनतर त्याला विशेष लोकप्रियता मिळाली ती ‘खतरों के खिलाडी’ या रिऍलिटी शो मुळे. ‘खतरों के खिलाडी’ या शो मुळे शिव ठाकरे आणि डेझी शाह विशेष चर्चेत आले. ‘खतरों के खिलाडी’चा स्पर्धक शिव ठाकरे आणि डेझी शाह गेल्या काही काळापासून डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. शो दरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चाहत्यांनी असा अंदाज लावला की शिव आणि डेझी शाह एकमेकांना डेट करत आहेत. (Shiv Thakare and Daisy shah Relationship)

शिवाय, हे दोघे सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट देखील करतात. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर, ते नियमितपणे बाहेर आणि शहरातील कार्यक्रमांमध्ये दिसले. दरम्यान त्यांच्यातील बाँडिंग पाहता चाहते आणि फॉलोअर्समध्ये कुजबुज रंगलेली पाहायला मिळतेय. दरम्यान चाहत्यांच्या या शंकेवर आता डेझी शाहने स्पष्टपणे भाष्य केल्याचं समोर आलं आहे.

पाहा शिवसोबतच्या नात्यावर काय म्हणाली डेझी शाह (Shiv Thakare and Daisy shah Relationship)

शिव ठाकरे आणि डेझी शाह यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चांना उधळून लावत डेझी शाहने ETimes सोबत संवाद साधला. या वेळी बोलताना तिने सांगितलं की, “शिव आणि ती फक्त मित्र आहेत. यापुढे डेझी म्हणाली, “शिव ठाकरे सोबतच्या लिंक-अप अफवांमुळे आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत आहोत हे जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही एकमेकांना डेट करत नाही. यापुढे ती म्हणाली आहे की, “तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफबद्दल दुनियेसमोर जितकं न्याल, त्याहून अधिकची माहिती ते कायमच अपेक्षित करतील.”

हे देखील वाचा – लग्नाच्या दोन वर्षांनी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर देणार गुड न्यूज? नव्या फोटोशूटमुळे चर्चेला उधाण

बर्‍याचदा अफवा या सेलिब्रिटींवर दबाव आणतात आणि प्रत्येकजण त्या अफवांना हाताळू शकत नसल्याची कित्येक उदाहरणे आहेत जी आजवर आपण पाहिली आहेत. डेटिंगच्या अफवांचा त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम होतो का याबद्दल बोलताना डेझी शाहने सांगितले की, “या अशा अफवांमुळे आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होत नाही. खरं तर, आम्ही पूर्वीपेक्षा आमच्यातली मैत्री अधिक घट्ट झाली आहे. आमची मैत्री काय आहे हे आम्हाला ते जगासमोर दाखवायला आवडत नाही.”

Tags: daisy shahkhatron ke khiladishiv thakare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
karan johar to kshitee jog

दिग्दर्शक करण जोहरने केलं अभिनेत्री क्षिती जोगचं कौतुक म्हणाला, "मला ठाऊक होत की…."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.