मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यंग आणि क्युट कपल म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांना ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये ते विवाहबंधनात अडकले, ज्याची चर्चा मराठी मनोरंजन विश्वात रंगली होती. (siddharth chandekar mitali mayekar)
लग्नानंतर सिद्धार्थ व मिताली अनेकदा रोमँटिक अंदाजात पाहायला मिळालेले आहे. मराठीतील हे क्युट कपल सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून त्यांचे फोटोस आणि व्हिडिओसची नेहमीच चर्चा होत असते. शिवाय ते अनेकदा सतत विदेशी टूरवर जाताना पाहायला मिळतात. सिद्धार्थ मिताली नेहमीच चर्चेत असतात, अशातच हे कपल लवकरच गुड न्यूज देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे मितालीची पोस्ट? (mitali mayekar pregnant)
अभिनेत्री मिताली मयेकर हिने नुकतीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिने एक हॉट पोझ दिली आहे. मितालीचा फोटोशूट चाहत्यांना तर आवडला, पण तिने या फोटोला दिलेलं कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधत आहे. अभिनेत्री पोस्टमध्ये म्हणते, “Mommy’s gettin hot!”. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत म्हटलंय “काय तू प्रेग्नंट आहेस ? खरं आहे का? वॉव”. तर आणखी एकाने लिहिलंय “MOTHER!!”. यावरून मिताली मयेकर प्रेग्नेंट आहे का ? सिद्धार्थ व मिताली लवकरच आई-बाबा होणार का ? अशी चर्चा सध्या सुरु झालेली आहे. (mitali mayekar pregnant?)
अभिनेत्री मिताली मयेकरच्या फोटोशूटची नेहमीच चर्चा होते. ती तिचे फोटोज शेअर करत नेहमीच क्रिएटिव्ह कॅप्शन देत राहते. शिवाय तिच्या बऱ्याच फोटोजना चाहत्यांची पसंती मिळते. मितालीने आतापर्यंत अनेक मालिका, सिनेमे व नाटकांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर मात्र ती कुठल्याच मालिका किंवा सिनेमात दिसली नसली, तरी सोशल मीडियाच्या मध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. मिताली व सिद्धार्थने नुकतंच मुंबईमध्ये त्यांच्या हक्काचं घर देखील खरेदी केलं, ज्याची जोरदार चर्चा रंगली होती. (siddharth chandekar mitali mayekar)
हे देखील वाचा : रितेश देशमुखच्या ‘वेड’चा रेकॉर्ड मोडीत काढत ‘बाईपण भारी देवा’ची भरघोस कमाई, ३० दिवसांत कमावले इतके कोटी